CoronaVirus : दिल्ली विमानतळावर विमानांसाठी जागा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 01:22 AM2020-03-27T01:22:40+5:302020-03-27T05:57:56+5:30
coronavirus : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्चपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमाने रद्द केली. त्यानंतर २४ ला मध्यरात्री आंतरदेशीय विमाने रद्द करण्यात आली.
- नितीन नायगांवकर
नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठ्या विमानतळाला सध्या पार्किंगच्या समस्येने ग्रासले आहे. आंतरराष्ट्रीय तसेच आंतरदेशीय विमाने रद्द करण्यात आल्याने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अक्षरश: धावपट्टीच्या शेजारची मोकळी जागाही पार्किंगसाठी वापरण्यात आली आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्चपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमाने रद्द केली. त्यानंतर २४ ला मध्यरात्री आंतरदेशीय विमाने रद्द करण्यात आली. खरे तर दिल्लीतील विमानतळ हे देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. दिवसाला १ हजार ४२४ विमाने दिल्लीतून उड्डाण घेतात आणि याठिकाणी उतरतात. येत्या मेपर्यंत १५०० पर्यंत वाढ होणार असल्याचे विमानतळ प्राधीकरणाच्या एका अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. विमानांचे वाहतूक मोठ्या प्रमाणात असले तरीही येथे केवळ २०० विमानांच्या पार्किंगची सोय आहे. मात्र सध्या कोरोनामुळे फेºया बंद असल्याने तब्बल ७०० विमानांनी दिल्ली विमानतळावर ठाण मांडले आहे.