coronavirus: आता आपल्याला कोरोनापासून केवळ देवच वाचवू शकतो, आरोग्यमंत्र्यांचे अजब विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 09:11 AM2020-07-17T09:11:39+5:302020-07-17T09:15:11+5:30
सुरुवातीच्या काही काळाता कोरोना नियंत्रणात राहिलेल्या कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
बंगळुरू - देशातील कोरोना विषाणूचा फैलाव प्रचंड वेगाने वाढत असताना काही राज्यांमध्ये परिस्थिती अधिकाधिक चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच सुरुवातीच्या काही काळाता कोरोना नियंत्रणात राहिलेल्या कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यानंतर आता कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी अजब विधान केले आहे. कोरोनापासून बचावासाठी आता आम्हाला केवळ देवच मदत करू शकतो, अशा शब्दात हतबलता व्यक्त केली आहे.
कर्नाटक सरकार सुरुवातीच्या काळात कोरोनाला रोखण्यात कमालीचे यशस्वी ठरले होते. मात्र नंतर राज्यातील बाधितांचा आकडा झपाट्याने वाढला असून, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्र (२.७५ लाख), तामिळनाडू (१.५१ लाख) आणि दिल्ली (१.१६ लाख) या देशातील सर्वाधिक प्रभावित राज्यांनंतर कर्नाटक चौथ्या स्थानावर पोहोचले आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर श्रीरामुलू म्हणाले की, जगभरात कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जागरुक राहण्याची गरज आहे. सत्ताधारी असो वा विरोधक, गरीब असो वा श्रीमंत हा विषाणू कुणासोबतही भेदभाव करू शकत नाही. राज्यातील परिस्थिती पाहता पुढील दोन महिने रुग्ण वाढीचा दर चढाच राहण्याची शक्यता आहे. आता सरकार किंवा मंत्र्यांच्या बेजबाबदारपणामुळे हा आजार फैलावत असल्याचा दावा कुणी करू शकतो. पण आता आपल्याला केवळ देवच वाचवू शकतो.
दरम्यान, येडियुरप्पा सरकारमधील वजनदार मंत्री असलेल्या श्रीरामुलू यांच्या विधानावर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी केलेले विधान हे कोरोनाविरोधात लढण्यास येडियुरप्पा सरकारला आलेल्या अपयशाला अधोरेखीत करत आहे. आम्हाला अशा सरकारची गरज नाही. अक्षम सरकारने जनतेला देवाच्या भरवशावर सोडले आहे, असे ट्वीट डी. के. शिवकुमार यांनी केले.
दरम्यान वाद वाढल्यानंतर श्रीरामुलू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, कोरोनाविरोधात लढण्यासाठी जनतेच्या सहकार्यासोबत देवाच्या मदतीचीही आम्हाला गरज आहे. जोपर्यंत कोरोनावर कुठली लस येत नाही तोपर्यंत केवळ देवच आपल्याला वाचवू शकतो, असे मला म्हणायचे होते. त्याचा चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी
गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…
'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...