Coronavirus : जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ४,२७,९४० वर पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 02:08 AM2020-03-26T02:08:19+5:302020-03-26T06:09:54+5:30

coronavirus : भारतात १३ बळी कोरोना विषाणूच्या साथीमुळे बुधवारी भारतात आणखी तीन बळी गेले. तमिळनाडू, मध्य प्रदेश व गुजरातमधील प्रत्येकी एका रुग्णाचा त्यामध्ये समावेश आहे.

Coronavirus: The number of coronavirus worldwide reaches 427940 | Coronavirus : जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ४,२७,९४० वर पोहोचली

Coronavirus : जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ४,२७,९४० वर पोहोचली

Next

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४,२७,९४० वर पोहोचली असून, बळींची एकूण संख्या १९,२४६ इतकी झाली आहे.
जगभरातील १८१ देशातील ही संख्या आहे. यामध्ये युरोपमधील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २,२६,३४० पेक्षा अधिक तर बळींची संख्या १२,७१९ इतकी आहे. आशियात ९९,८०५ रुग्ण आहेत तर ३,५९३ बळी गेले आहेत. जगातील आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी सांगितले की, सध्या युरोप हा कोरोना साथीचे केंद्र बनला असला, तरी अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक आहे. अमेरिका या साथीचे नवे केंद्र बनण्याची शक्यता आहे.
भारतात १३ बळी कोरोना विषाणूच्या साथीमुळे बुधवारी भारतात आणखी तीन बळी गेले. तमिळनाडू, मध्य प्रदेश व गुजरातमधील प्रत्येकी एका रुग्णाचा त्यामध्ये समावेश आहे. यामुळे देशातील एकूण बळींची संख्या १३ वर गेली आहे, तर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ६०६ झाली आहे.
बुधवारी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील एका ६५ वर्षीय महिला रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर राज्यात कोरोना संसर्गाचे आणखी सहा रुग्ण आढळले. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १५ झाली आहे. यामध्ये भोपाळ येथील एका पत्रकाराचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हा पत्रकार २० मार्च रोजी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार बैठकीस उपस्थित होता. तसेच त्यानंतर तो राज्य विधानसभेतही उपस्थित होते. यामुळे खळबळ उडाली आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद येथे कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका ८५ वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. कोरोनाचा राज्यातील हा दुसरा बळी आहे. या महिलेने परदेश प्रवास केला होता.

पाकिस्तानमध्ये १००० जणांना संसर्ग
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या १०००च्या वर गेली आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानसेवा दोन एप्रिलपर्यंत थांबविण्यात आली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. कोविड-१९मुळे संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या १,०३७ झाली आहे. त्यामध्ये सिंधप्रांतात ४१३, बलुचिस्तानमध्ये ८०, इस्लामाबादमध्ये १५ आणि पाकिस्तानातील काश्मीरमध्ये एकजण संक्रमित आहे. तर कोरोनामुळे सातजणांचा मृत्यू झाला, तर १८ रुग्ण बरे झाले आहेत.

Web Title: Coronavirus: The number of coronavirus worldwide reaches 427940

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.