Coronavirus: देशभरात रुग्णांची संख्या ३०० पार; मोदींनी व्यक्त केली मोठी भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 09:24 PM2020-03-21T21:24:17+5:302020-03-21T21:25:30+5:30
Coronavirus: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. चीनपेक्षा इटलीमध्ये मृत्यूंची संख्या वाढलेली आहे. जगभरात आतापर्यंत ११ हजाराच्या वर कोरोनामुळे बळी गेले असून भारतात अद्याप चार जणांचा मृत्यू झालेला आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरस देशात धोकादायक पातळीवर पोहोचला असून संक्रमित रुग्णांच्या संख्येमध्ये आज कमालीची वाढ झाली आहे. सरकारी आकड्यांनुसार आज कोरोनाग्रस्तांची संख्या ३१२ झाली आहे.
केंद्र सरकारसह राज्य सरकारने कडक पाऊले उचललेली आहेत. मात्र, बाजारपेठा, कंपन्या बंद ठेवूनही लोक गावी परतत आहेत. यामुळे कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसरण्याची भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ३१२ पैकी ३९ जण परदेशी नागरिक असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून राज्यात रुग्णांची संख्या ६४ वर गेली आहे. तर दिल्ली २५, केरळमध्ये ४५, राजस्थान २१, कर्नाटक १८, उत्तर प्रदेश २३, गुजरात १३, तेलंगाना १०, लडाखला 13 अशी आकडेवारी आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. चीनपेक्षा इटलीमध्ये मृत्यूंची संख्या वाढलेली आहे. जगभरात आतापर्यंत ११ हजाराच्या वर कोरोनामुळे बळी गेले असून भारतात अद्याप चार जणांचा मृत्यू झालेला आहे. भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यात आलेला आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याची शक्यता असून आज पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांची आकडेवारी मोठी असल्याने देशासमोर धोक्याची घंटा वाजत आहे.
Coronavirus: गावाकडे निघालेल्या लाखो नागरिकांना पंतप्रधानांचा महत्त्वाचा संदेश; म्हणाले...
बेंगळुरूमध्ये आज पालघरसारखाच प्रकार घडला. राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या दोन कोरोनाचे स्टँप असलेल्या संशयितांना प्रवाशांनी पकडून रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात दिले आहे. यामुळे सर्व प्रवाशांना उतरवून कोचच सॅनिटाईज करण्यात आला आहे. तर उद्या तब्बल २४०० ट्रेन आणि १००० वर विमाने बंद ठेवण्यात येणार आहेत.