Coronavirus: होम कॉरेंटाईन झाल्यास १५ हजार रुपये मिळणार; सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 03:17 PM2020-03-17T15:17:24+5:302020-03-17T15:28:52+5:30
कोनामुळे जगभरात आतापर्यत 7,000 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. एकट्या चीनमध्येच कोरोनामुळे 3,100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल आहे.
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसने चीन, युरोप, इटलीसह जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. भारतामध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून आज नोएडातील दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 134वर पोहचला आहे.
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी देशातील प्रत्येक राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. ओडिशामध्ये देखील कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण आढळ्यानंतर ओडिशा सरकारने खबरदारी म्हणून पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ओडिशा सरकारने एक उपक्रम जाहीर केला आहे.
ओडिशाचे मुख्य सचिव एके. त्रिपाठी या उपक्रमाबाबत माहिती देताना म्हणाले की, राज्यातील जो व्यक्ती परदेशातून आला असेल त्याने १०४ या टोल फ्री नंबरवर किंवा https://covid19.odisha.gov.in या ऑनलाइन पोर्टलवर अनिवार्य पद्धतीने स्वतःची परदेशातून आल्यानंतर 24 तासांच्या आत नोंदणी करावी. तसेच नोंदणी करताना तुमची मूळ माहिती आणि संपर्क क्रमांक उपलब्ध करुन द्यावा अशी सूचना देखील एके. त्रिपाठी यांनी दिल्या आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी नोंदणी केल्यानंतर १४ दिवसांसाठी स्वतःच्याच घरात वेगळं रहावं लागेल (होम कॉरेंटाईन) असं त्यांनी सांगितले. सरकारच्या नोंदणी करणे आणि विलगीकरणात राहण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी १५ हजार रुपये देण्याचं जाहीर केले आहे.
कोनामुळे जगभरात आतापर्यत 7,000 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. एकट्या चीनमध्येच कोरोनामुळे 3,100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल आहे. तर भारतात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात कोरोनाबाधित 13 जण बरे झाले आहेत. भारतामध्ये देखील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 134 वर पोहोचली आहे.