CoronaVirus तेराव्याच्या जेवणावळीमुळे २७ हजार लोक क्वारंटाईनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 04:53 AM2020-04-06T04:53:51+5:302020-04-06T04:54:13+5:30
मध्यप्रदेशातील घटना : आईच्या निधनानंतर दुबईतून आलेला तरुण ‘पॉझिटिव्ह’
मोरेना (मध्य प्रदेश) : आईच्या मृत्यूनंतर रिवाजानुसार तेराव्याचे गावजेवण घालणाऱ्या युवकाखेरीज जेवणावळीस गेलेले एकूण १० जण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे निष्पन्न झाल्याने मध्यप्रदेशच्या मोरेना जिल्ह्यातील अनेक गावांतील एकूण २२ हजार लोकांना ‘होम क्वारंटाईन’ करावे लागले आहे.
मोरेनाचे उपविभागीय अधिकारी आर. एस. बांका यांनी सांगितले की, दुबईतील एका हॉटेलात वेटर म्हणून काम करणारा एक तरुण आईचे निधन झाल्याचे कळल्यावर १५ मार्चला गावी परत आला. नंतर २० मार्च रोजी त्याने आईच्या तेराव्या निमित्त प्रथेनुसार गावजेवण दिले. जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आर. सी. बांदिल म्हणाले की, या तरुणाने सुरुवातीस आपण दुबईहून आलो हे लपवून ठेवले. परंतु २ एप्रिल रोजी त्याची व त्याच्या पत्नीची कोरोनाची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर सर्व काही खरे सांगितले. बांका म्हणाले की, तेराव्याच्या जेवणावळीस गेलेल्या आणखी १० जणांच्या कोरोना चाचण्या ३ एप्रिल रोजी ‘पॉझिटिव्ह’ आल्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाची धावाधाव सुरु झाली. जेवणावळीस सुमारे दोन हजार लोक गेले होते हे समजल्यावर त्या सर्वांना व त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या पंचक्रोशीतील सुमारे २७ हजार लोकांना शोधून काढून त्यांना घरांमध्ये क्वारंटाईन केले.
करण्यात आले आहे. संसर्गाचा संशय असलेल्या २४ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)