Corona Omicron variant : चिंता वाढली! ओमायक्रॉनच्या कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात, ब्रिटनमध्ये अनेक भागांत कोरोनाचा कहर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 11:30 AM2021-12-07T11:30:06+5:302021-12-07T11:31:07+5:30
ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या कम्यूनिटी स्प्रेडलाही सुरुवात झाली आहे. येथे ट्रॅव्हल हिस्ट्री नसलेल्या अनेकांना कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटची लागन होत आहे.
जगातील तब्बल 38 हून अधिक देशांमध्ये कोरोनाच्या (COVID-19) ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिअंटची नोंद झाली आहे. सर्वप्रथम आफ्रिकेत आढळून आलेल्या, या व्हेरिअंटची लागण झालेले रुग्ण आता अमेरिका, यूके, युरोप आणि भारतातही समोर येत आहेत. या ठिकाणी ओमायक्रॉन वेगाने पसरताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या कम्यूनिटी स्प्रेडलाही सुरुवात झाली आहे. येथे ट्रॅव्हल हिस्ट्री नसलेल्या अनेकांना कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटची लागन होत आहे.
युकेचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी संसदेत सांगितले की, देशात कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटची लागण झालेले ३३६ लोक समोर आले आहेत. इंग्लंडमध्ये ओमायक्रॉनचे कम्यूनिटी स्प्रेड होतानाही दिसत आहेत. इंग्लंडमध्ये आतापर्यंत 261 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. स्कॉटलंडमध्ये 71 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर वेल्समध्ये 4 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
ट्रॅव्हल हिस्ट्री नसतानाही लोक होतायत संक्रमित -
साजिद जाविद म्हणाले की, ट्रॅव्हल हिस्ट्री नसतानाही लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे, इंग्लंडमधील अनेक भागांत कम्यूनिटी स्प्रेड होत असल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचलो आहोत. आम्ही नशिबावर काहीही सोडत नाही. जगातील शास्त्रज्ञ या नव्या व्हेरिअंटसंदर्भात माहिती एकत्र करत असतानाच, कोरोनाच्या या न्या व्हेरिअंटविरोधात आपली एक बचाव यंत्रणा बळकट करणे हे आमचे धोरण आहे.
जाविद यांनी यूके हेल्थ सिक्योरिटी एजन्सीने जारी केलेल्या डेटाचाही उल्लेख केला, यात वैज्ञानिकांनी Omicronचा कालावधी डेल्टा व्हेरिअंटपेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच, हा व्हायरस किती घातक आहे आणि यावर लसीचा काय परिणाम होईल हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे, हा व्हेरिअंट आपल्याला रिकव्हरीच्या पटरीवरून उतरवेल की नाही, आपण काहीही निश्चितपणे सांगू शकत नाही, असेही जाविद यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -
- भयावह! Omicron व्हेरिअंटवर आता सिंगापूरचा नवा रिपोर्ट, चिंता वाढवणारी माहिती आली समोर