Coronavirus: ओमायक्रॉन भारतात, सर्वाधिक धोका कोणाला? जाणून घ्या संपूर्ण माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 07:34 AM2021-12-04T07:34:01+5:302021-12-04T07:34:39+5:30
Coronavirus: कोरोना संसर्गाचा सर्वात वेगाने प्रसार करणारा omicron variant भारतात दाखल झाला आहे. त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहेत. भारतात आता या विषाणूचा कोणाला अधिक धोका असू शकतो, पाहूया...
कोरोना संसर्गाचा सर्वात वेगाने प्रसार करणारा ओमायक्रॉन विषाणू भारतात दाखल झाला आहे. त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहेत. कर्नाटकात दोन रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कातील पाच जणांना कोरोना झाल्याचेही निदान झाले आहे. त्यामुळे वेगाने पसरणाऱ्या या विषाणूची सर्वांना धास्ती आहे. जगभरात अनेक देशांमध्ये या विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. भारतात आता या विषाणूचा कोणाला अधिक धोका असू शकतो, पाहूया...
भारतात किती चिंताजनक स्थिती?
- लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे भारताची चिंता अधिकच वाढली आहे.
- भारतात आतापर्यंत १.२५ अब्ज डोस देण्यात आले. त्यातील ७९ कोटी लोकांनी पहिला डोस पूर्ण केला तर ४६ कोटी लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.
- भारतातील केवळ 32 % लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. शिवाय १२ कोटी लोकांनी दुसरा डोसच घेतलेला नाही. हीच चिंतेची बाब ठरू शकते.
- ओमायक्रानला लसीकरण रोखू शकणार नाही, असाही दावा केला जात आहे. त्यामुळे भीती वाढली आहे. असे झाल्यास भारतात रुग्णसंख्या झपाट्याने वाढू शकते.
सर्वाधिक धोका कोणाला?
ज्यांनी लसीचा एकही डोस घेतला नाही त्यांना सर्वाधिक धोका असेल. लस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे केवळ एक डोस घेऊन वावरणाऱ्यांना ओमायक्रॉनचा धोका अधिक असू शकतो. त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.
भारतात चिंतेची गोष्ट
भारतात जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचा वेग अत्यंत कमी आहे. कोणत्या प्रकारच्या विषाणूची बाधा कोणत्या रुग्णांना झाली आहे, हे तपासण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग केले जाते. तेच जर धिम्या गतीने होत असेल, तर वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनला रोखणे कठीण होऊ शकते.
दहा दिवसांत ३३ देशांत शिरकाव
२३ नोव्हेंबर
द. अफ्रिका १८३
बोत्सवाना १९
२६ नोव्हेंबर
नेदरलँड १६
हाँगकाँग ०७
इस्रायल ०२
बेल्जियम ०२
२७ नोव्हेंबर
ब्रिटन ३२
जर्मनी १०
ऑस्ट्रेलिया ०८
इटली ०४
झेक रिपब्लिक ०१
२८ नोव्हेंबर
डेन्मार्क ०४
ऑस्ट्रिया ०१
२९ नोव्हेंबर
कॅनडा ०७
स्वीडन ०४
स्वित्झरलँड ०३
स्पेन ०२
३० नोव्हेंबर
पोर्तुगाल १३
जपान ०२
१ डिसेंबर ३३
द. कोरिया ०३
नायजेरिया ०३
ब्राझिल ०२
नॉर्वे ०२
सौदी अरेबिया ०१
आयरलँड ०१
यूएई ०१
२ डिसेंबर
भारत ०२
ग्रीस ०१
३ डिसेंबर
अमेरिका ०८
सिंगापूर ०२
मलेशिया ०१
फ्रान्स ०८