coronavirus: या राज्यात दर चारपैकी एक जण कोरोनाच्या कचाट्यात, सेरो सर्वेमधून समोर आली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 02:48 PM2020-07-21T14:48:23+5:302020-07-21T14:58:02+5:30
सेरो सर्वेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी सुमारे २३.४८ टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी दिसून आल्या. याचा अर्थ एवढे लोक कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत.
नवी दिल्ली - जून महिन्यामध्ये देशातील कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून समोर आलेल्या दिल्लीमधील कोरोनाचा फैलाव आता नियंत्रणात येताना दिसत आहे. दिल्लीमधील नव्या रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. तसेच रिकव्हरी रेटही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान, राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने राज्यात व्यापक सेरो सर्वे केला होता. या सर्वेमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दिल्लीमधील दर चार व्यक्तींपैकी एक जण कोरोनाच्या कचाट्यात सापडल्याचे समोर आले आहे. सर्वेमध्ये जी माहिती गोळा करण्यात आली. त्यानुसार सेरो सर्वेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी सुमारे २३.४८ टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी दिसून आल्या. याचा अर्थ एवढे लोक कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. तसेच दिल्लीमध्ये कोरोनाचे जेवढे रुग्ण सापडले, त्यांच्यापैकी बहुतांश रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली.
सेरो सर्वेमध्ये करण्यात आळेल्या संशोधनानुसार आता कोरोनाच्या फैलावास सुरुवात होऊन सहा महिने पूर्ण होत आले आहेत. यादरम्यान दिल्लीमध्ये सुमारे २३.४८ टक्के लोक कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. याचा अर्थ सरकारने कोरोनाला रोखण्यासाटी जे निर्णय घेतले त्यांचा फायदा मिळाला आहे. मात्र अजूनही अन्य लोक कोरोनाच्या तावडीत सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिक खबरदारी बाळगावी लागणार आहे.
दिल्लीमध्ये २७ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान सेरो सर्व्हे करण्यात आळा होता. या सर्वेमध्ये राज्यातील सर्व ११ जिल्ह्यांमधून नमुने घेण्यात आले होते. यामध्ये लोकांच्या रक्तांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली होती. या सर्व चाचण्या आयसीएमआरच्या दिशानिर्देशांनुसार करण्यात आल्या होता. तसेच एकूण २२ हजार नमुने गोळा करण्यात आले होते.
मात्र दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांत दिल्लीमधील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट दिसून आली आहे. सद्यस्थितीत दिल्लीमध्ये केवळ १५ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ३६०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सुमारे १ लाख रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी