Coronavirus:एवढी एक साधी गोष्ट केली, तरी कोरोनाचं संकट 60 टक्क्यांनी कमी होईल; वाचा काय सांगतंय ICMR
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 09:57 AM2020-03-24T09:57:18+5:302020-03-24T10:10:20+5:30
देशातील ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांना घरातून बाहेर पडू नका असं आवाहन केले आहे.
नवी दिल्ली – जगभरासह भारतातही कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या देशात ५०० पर्यंत पोहचली आहे तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय देशातील अनेक राज्य सरकारने घेतला आहे. तरीही कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे.
देशातील ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांना घरातून बाहेर पडू नका असं आवाहन केले आहे. यातच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(ICMR) ने नुकताच केलेल्या अहवालात दावा केला आहे की, जर लोकांना घरातच राहण्याची सक्ती केली तर कोरोनाचा प्रार्दुभाव रोखणं बऱ्याच प्रमाणात फायदेशीर ठरेल.
भारतात कोरोना व्हायरस दुसऱ्या टप्प्यात आहे. तिसऱ्या टप्प्याकडे भारत जात आहे. या टप्प्यात कम्यूनिटी ट्रान्समिशन होतं. म्हणजे सामूहिक संसर्ग होईल. जर असं झालं तर भारतातील परिस्थिती भयंकर होईल. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कडक पावले उचलावी. लोकांनी एकमेकांशी संपर्क साधू नये म्हणून लॉकडाउन आणि कर्फ्यूचा अवलंब केला जात आहे. आयसीएमआरच्या अभ्यासामध्ये नमूद केलं आहे की, जर लोकांना विलग ठेवणे, घरात राहण्याची सक्ती अशी कठोर मार्ग अवलंबले गेले तर या विषाणूची अंदाजित संशयित रुग्ण 62 टक्क्यांनी कमी होऊ शकतात.
अशा परिस्थितीत सरकारने संपूर्णपणे अंमलबजावणीसाठी लॉकडाउनचा मार्ग स्वीकारला पाहिजे. जगाच्या इतर देशांकडून आतापर्यंत आलेल्या बातम्यांमधून असं दिसून आलं आहे की ज्या देशांमध्ये होम कोरेन्टाईन आणि लॉकडाऊन अवलंब केला गेला त्या देशांमध्ये कोरोना जास्त काळ टिकला नाही. सिंगापूर, हाँगकाँग आणि दक्षिण कोरिया ही सर्वात मोठी उदाहरणे आहेत. डब्ल्यूएचओने लॉकडाउनसह संक्रमित लोकांची ओळख आणि चाचणी करणेदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनापासून भारताला वाचवण्यासाठी लोकांच्या सहकार्याची गरज आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची राज्यातील संख्या १०१ झाली आहे.