CoronaVirus: निरागसांना कोण समजावणार? कोणी आई, तर कोणी बाप गमावला; कोरोनाच्या संकटात 1742 मुले अनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 01:53 PM2021-06-01T13:53:35+5:302021-06-01T13:54:20+5:30

Children's lost there parents due to corona Virus: सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी काहीतरी करण्याचे, त्यांचे संगोपन करण्याचे आदेश दिले होते. आता राज्ये आणि केंद्र सरकारने त्यांच्या मदतीसाठी हात पुढे केले आहेत.

CoronaVirus orphaned 1742 children, another 7464 lost one parent, Government to Supreme Court | CoronaVirus: निरागसांना कोण समजावणार? कोणी आई, तर कोणी बाप गमावला; कोरोनाच्या संकटात 1742 मुले अनाथ

CoronaVirus: निरागसांना कोण समजावणार? कोणी आई, तर कोणी बाप गमावला; कोरोनाच्या संकटात 1742 मुले अनाथ

googlenewsNext

 कोरोना संकटाने देशभरात लाखो बळी (Corona Death) घेतले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. बेरोजगार झाले आहेत. परंतू त्यापेक्षाही मोठे दु:ख हे हजारो मुलांवर कोसळले आहे. देशात मार्च 2020 पासून ते आजपर्यंत कोरोनामुळे 1742 मुलांनी आई वडील दोन्ही गमावले आहेत. तर 7464 मुलांनी आई किंवा वडीलपैकी एक गमावले आहेत. (Covid-19 pandemic, which has devastated families across the country, has orphaned over 1,700 children, led to 140 children being abandoned while more than 7,400 children lost one of their parents,)


CoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी काहीतरी करण्याचे, त्यांचे संगोपन करण्याचे आदेश दिले होते. केंद्र सरकारने ही आकडेवारी आज सर्वोच्च न्यायालयासमोर दिली आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शनऑफ चाईल्ड राईट्स (NCPCR) ने या मुलांच्या संगोपनासाठी, भविष्यासाठी आर्थिक मदत मागितली आहे. 


कोरोना संक्रमणामध्ये अनाथ झालेल्या मुलांच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरु आहे. यावेळी सरकारने न्यायालयाला सांगितले की, मार्च 2020 पासून आतापर्यंत 1742 मुलांनी आपले पालक गमावले तर 7464 मुलांनी एका पालकाला गमावले आहे. 

CoronaVirus: लहान मुलांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका? केंद्राने दूर केले टेन्शन


महाराष्ट्रातून धक्कादायक आकडेवारी
महाराष्ट्राच्या अहमदनगरमध्ये एका महिन्याच्या आत 10000 मुले आणि अल्पवयीन कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. पेडियाट्रीक टास्क फोर्सचे सदस्य सचिन सोलट यांनी सांगितले की, यामध्ये काही मोठा इशारा देण्यासारखे नाहीय. लहान मुलांना तरुणांच्या तुलनेत 11.5 टक्के कोरोनाची बाधा झाली आहे, जी असामान्य नाहीय. 

कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) लहान मुलांसाठी (Children's) सर्वाधिक धोकादायक असणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारचे म्हणणे याहून वेगळे आहे. एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी याचे कोणतेही पुरावे नाहीत असे म्हटले आहे. गुलेरिया म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे मुलांना कमी प्रमाणावर संक्रमण झाले आहे. यामुळे आतापर्यंत तरी असे वाटत आहे की, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना संक्रमित करणार नाही.  अनेक संशोधकांनी लहान मुलांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे म्हटले आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुले कोरोनाने प्रभावित झालेली नाहीत. त्यांना लसही दिलेली नाही. यामुळे ते तिसऱ्या लाटेत सर्वाधिक संक्रमित होतील, याचे काही पुरावे मिळालेले नाहीत, असे गुलेरिया यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे मांडले आहे.  

Read in English

Web Title: CoronaVirus orphaned 1742 children, another 7464 lost one parent, Government to Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.