ऐंशी वर्षाच्या आजी-आजोबांचा कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात, दोन लाख केले दान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 11:56 AM2020-05-11T11:56:43+5:302020-05-11T11:57:18+5:30

भागीरथ आजोबांनी शेवटच्या क्षणी आर्थिक मदतीसाठी कोणाजवळ हात पसरवण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी दोन लाख रूपये पत्नीच्या नावे जमा केले होते.

Coronavirus outbreak: Elderly Couple Gave One lakh Each In Pm care fund and chief minister relief fund--SRJ | ऐंशी वर्षाच्या आजी-आजोबांचा कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात, दोन लाख केले दान

ऐंशी वर्षाच्या आजी-आजोबांचा कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात, दोन लाख केले दान

Next

जन्माला आलोय तसेच एक ना एक दिवस आपल्यालाही जायचे आहे. या धरतीवर आपण पाहुणेच आहोत. कोरोनाने जशी सगळीकडे नकारात्मकता पसरवली. तसेच सकारात्मक दृष्टीकोनही निर्माण केले आहेत. आयुष्याची संध्याकाळ केव्हा होईल हे माहित नाही. जे आपले नाहीच, त्याबद्दल कसला गर्व बाळगायचा त्यामुळे कुठेतरी आपणही समाजाचे देणे लागतो असे म्हणत आजी-आजोबांनी पीएम केयर फंडमध्ये जवळपास एक लाख रूपये मदतीसाठी दिले आहेत.तसेच 
मुख्यमंत्री मदत निधीतही त्यांनी एक लाख रूपये दिले आहेत. अशाप्रकारे दोन लाखांची मदत त्यांनी केली आहे.

मूळ बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील हिराजी खेड्यातील भगीरथ मिश्रा पत्नी पुष्पा मिश्रासह राहतात. त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमधून त्यांचा घरखर्च भागतो. ऐंशी वर्षांचे भगीरथ मिश्रा प्रयागराजमध्ये अधीक्षकपदी कार्यालयातून निवृत्त झाले आहेत. त्यांना मुलं नाहीत. दोघेच पती -पत्नी एकमेकांची काळजी घेतात. एक दिवशी वृत्तपत्रात कोणी कशी कोरोनासाठी मदत केली. यासंदर्भातील बातमी मिश्रा वाचत होते. त्याचवेळी एका लहानग्या मुलाने कोरोनाच्या युद्धासाठी त्याची पिगी बँकेत जमा झालेली रक्कम पीएम केअर फंडला दिल्याची बातमी त्यांनी वाचली. 438 रुपये या चिमुकल्याने दिले होते. ही बातमी वाचून त्यांनीही पीएम केअर्समध्ये मदत जमा करण्याचा निर्धार केला. भागीरथ आजोबांनी शेवटच्या क्षणी आर्थिक मदतीसाठी कोणाजवळ हात पसरवण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी दोन लाख रूपये पत्नीच्या नावे जमा केले होते. भविष्याचा विचार न करता आजोबांनी आपल्या आयुष्यभराची जमापुंजीच दान केली.

जनकल्याणासाठी दोन लाख रुपये दिल्याने त्यांना मोठा समाधान मिळाल्याचे वृद्ध दाम्पत्य सांगतात. आजपर्यंत आजी-आजोबांना मदत देण्यात आल्याच्या घटना आपण पाहिल्यात. मात्र आजी -आजोबांनीच पुढाकार घेत मदत केल्याची ही बातमी इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार हे मात्र नक्की.
 

Web Title: Coronavirus outbreak: Elderly Couple Gave One lakh Each In Pm care fund and chief minister relief fund--SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.