CoronaVirus: जगभरात कोरोना लाट पुन्हा तीव्र; एकाच आठवड्यात वाढले 12% रुग्ण, भारतातील 13 राज्यांनी टेन्शन वाढवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 11:56 AM2021-07-22T11:56:21+5:302021-07-22T12:00:07+5:30
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर झालेल्या एका सिरो सर्व्हेनुसार अद्यापही जवळपास 40 कोटी लोकांना कोरोनाचा धोका...
वॉशिंग्टन/नवी दिल्ली - भारतासह संपूर्ण जगातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या काही दिवसांत पुन्हा वाढली आहे. भारतात रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारच्या जवळपास आहे. तर, जगात गेल्या आठवड्यात कोरोनाचे 34 लाख नवे रुग्ण समोर आले. जागतिक आरोग्य संखटनेने म्हटले आहे, की गेल्या आठवड्यात 3.4 मिलियनहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. ही संख्या या पूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत 12 टक्क्यांनी अधिक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रनांच्या म्हणण्यानुसार, मृतांची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या आठवड्यात जगभरात 57,000 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू वेस्टर्न पॅसिफिक आणि युरोपीयन देशांत झाले आहेत. गेल्या आठवड्यात डब्ल्यूएचओने म्हटले होते, की कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण इंडोनेशिया, इंग्लंड, ब्राझील, भारत आणि अमेरिकेत होते.
भारतासंदर्भात बोलायचे झाल्यास, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर झालेल्या एका सिरो सर्व्हेनुसार (देशव्यापी सर्वेक्षण) जवळपास 40 कोटी लोकांना कोरोनाचा धोका आहे. या सर्वेत असेही सांगण्यात आले आहे, की 6 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या देशातील नागरिकांपैकी दोन तृतियांश लोकांत सार्स-सीओव्ही-2 अँटीबॉडी आढळून आली आहे. रिपोर्टनुसार देशातील एक तृतियांश लोकांत ही अँटीबॉडी नाही. याचाच अर्थ जवळपास 40 कोटी लोकांना अजूनही कोरोना व्हायरस संक्रमणाचा धोका आहे.
CoronaVirus: लसीचे संरक्षण कवच भेदून कमजोर पडतोय डेल्टा व्हेरिएंट, पण...
या रांज्यांनी टेन्शन वाढवलं -
महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि इशान्येकडील अनेक राज्यांत मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण समोर येत आहेत. केरल, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चिंतेचा विषय म्हणजे, महिन्याच्या सुरुवातीला यांपैकी काही राज्यांत संक्रमण दर अत्यंत कमी झाला होता. मात्र, आता हळू-हळू रुग्ण संख्या पुन्हा वाढताना दिसत आहेत.
गेल्या 24 तासांत या राज्यांत आढळले ससर्वाधिक रुग्ण -
- केरळ - 17,481
- महाराष्ट्र - 8,159
- आंध्र प्रदेश - 2,527
- ओडिशा - 1,927
- तामिळनाडू - 1,891
भारतात आतापर्यंत 4,18,987 मृत्यू -
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 41,383 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर, 507 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 38,652 रुग्ण बरे झाले आहेत.
- एकूण रुग्ण - 3,12,57,720
- बरे झालेले एकूण रुग्ण - 3,04,29,339
- सक्रिय रुग्ण - 4,09,394
- एकूण मृत्यू - 4,18,987
- लसीकरणाचा आकडा - 41,78,51,151
India reports 41,383 new #COVID19 cases, 38,652 recoveries, and 507 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry.
— ANI (@ANI) July 22, 2021
Total cases: 3,12,57,720
Total recoveries: 3,04,29,339
Active cases: 4,09,394
Death toll: 4,18,987
Total vaccination: 41,78,51,151 pic.twitter.com/876XngVSIP
दुसरीकडे, अमेरिकेच्या सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेन्टच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे, की भारतात कोरोना व्हायरस संक्रमणामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 34 लाख ते 49 लाख एवढा असू शकतो. यासंस्थेने जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतचा डाटा जमा केला आहे.