CoronaVirus : देशात कोरोनाचे ३५ हजारांवर नवे रुग्ण, रुग्ण बरे होण्याचा दर मार्च २०२०नंतर सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 05:52 AM2021-08-19T05:52:50+5:302021-08-19T05:53:24+5:30
CoronaVirus : बुधवारी सकाळी ८ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत ४४० रुग्णांचा मृत्यू झाला. याबरोबरच एकूण मृतांची संख्या ४,३२,५१९ झाली आहे.
नवी दिल्ली : देशात मागील २४ तासांत कोरोनाचे ३५,१७८ नवीन रुग्ण आढळले असून, याबरोबरच एकूण संक्रमितांची संख्या ३,२२,८५,८५७ वर गेली आहे. राष्ट्रीय स्तरावर रुग्ण बरे होण्याचा दर ९७.५२ टक्के नोंदला गेला.
बुधवारी सकाळी ८ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत ४४० रुग्णांचा मृत्यू झाला. याबरोबरच एकूण मृतांची संख्या ४,३२,५१९ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊन ती ३,६७,४१५ पर्यंत खाली आहे. मंगळवारी कोरोनासाठी १७,९७,५५९ चाचण्या केल्या. यानंतर देशात करण्यात आलेल्या चाचण्यांची एकूण संख्या ४९,८४,२७,०८३ वर गेली.
५६ कोटींवर लस मात्रा
देशात आजवर कोरोना लसीच्या ५६.०६ कोटी मात्रा देण्यात आल्या. देशात मागील २४ तासांत कोरोनामुळे झालेल्या ४४० मृत्यूमध्ये केरळचे १२७ व
महाराष्ट्रातील ११६ आहेत.
देशात कोरोनामुळे आजवर ४,३२,५१९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात महाराष्ट्रातील १,३५,२५५, कर्नाटकातील ३७,०३९, तामिळनाडूतील ३४,५७९, दिल्लीतील २५,०७३, उत्तर प्रदेशातील २२,७८६, केरळमधील १८,८७० व पश्चिम बंगालमधील १८,३१८ मृत्यूंचा समावेश आहे.