Coronavirus: वेदनादायक! ५०० रुपये घ्या अन् घरी जा; ‘लॉकडाऊन’मुळे मजुराची गुजरात ते राजस्थान पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 03:41 PM2020-03-25T15:41:01+5:302020-03-25T15:43:23+5:30

लॉकडाऊनमुळे या मजुरांच्या मालकांनी कामबंद केलं आहे. बुधवारी सांबरकाठा येथे हायवेवर एक मजूर आपल्या कुटुंबासह सामान घेऊन चालत जाताना दिसला

Coronavirus: Painful! Take 500 rupees and go home; Workers Forced To Walk Back To Native In Rajasthan pnm | Coronavirus: वेदनादायक! ५०० रुपये घ्या अन् घरी जा; ‘लॉकडाऊन’मुळे मजुराची गुजरात ते राजस्थान पायपीट

Coronavirus: वेदनादायक! ५०० रुपये घ्या अन् घरी जा; ‘लॉकडाऊन’मुळे मजुराची गुजरात ते राजस्थान पायपीट

Next

अहमदाबाद – कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. खासगी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना घरीच बसावं लागत आहे. अशातच गुजरातच्या अहमदाबादेत असणाऱ्या हजारो मजूरांना चालत त्यांच्या राजस्थान येथील घरी जावं लागत आहे.

लॉकडाऊनमुळे या मजुरांच्या मालकांनी कामबंद केलं आहे. बुधवारी सांबरकाठा येथे हायवेवर एक मजूर आपल्या कुटुंबासह सामान घेऊन चालत जाताना दिसला. यातील बहुतांश बुधवारी दुपारी इदर, हिंमतनगर येथे पोहचले. अतिउष्णतेमुळे यांचे चेहरे थकलेले दिसत होते. राजस्थानातील मजूर तेजभाईने सांगितले की, मी अहमदाबादच्या रानीप परिसरात काम करतो. माझ्या मालकांनी मला कामबंद करुन पुन्हा जाण्यासाठी सांगितले. त्यांनी मला बसभाडे दिले. पण सर्व सार्वजनिक वाहतूक बंद आहेत. त्यामुळे आमच्या गावापर्यंत पायपीट करावी लागत आहे.

NBT

पोलिसांनी केली मदत

या मजुरांच्या कुटुंबाला जेवण आणि पाणी मिळणंही कठीण झालं. लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल्स बंद होते. मालकांनी ५०० रुपये दिले होते दरम्यान, साबरकांठा येथे पोलिसांनी त्यांची मदत केली अन् जेवणही दिले.

साबरकांठाचे पोलीस अधीक्षक चैतन्य मंडलिक म्हणाले, राजस्थानमधील सिरोही, उदयपूर किंवा डूंगरपूर या गावात पोहोचण्यासाठी वाहतुकीची काही व्यवस्था केली जाईल, असं मी या मजुरांना आश्वासन दिले आहे, आम्ही त्यांना अन्न, बिस्किटे आणि पाणी दिले आहे. पायपीट करण्याचा त्यांनी धोका पत्करला कारण त्यांच्याकडे पर्याय नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात तीन आठवड्यांच्या लॉकडाउनची घोषणा केली. आतापर्यंत देशातील ५६२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४३ परदेशी आहेत. ४० लोकांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्याच वेळी ११ लोकांचा मृत्यू देखील झाला आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान?

मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. घराबाहेर पडू नका, तुमच्या घराच्या उंबरठ्याबाहेर एक लक्ष्मणरेषा ओढण्यात आली आहे. ती ओलांडू नका. घरातच राहावे. तुमचे घराबाहेर पडणारे एक पाऊल, काही लोकांच्या निष्काळजीपणाने, काहींच्या गैरसमजुतीने, तुम्हाला, तुमच्या मुला-बाळांना, आई-वडिलांना, तुमच्या कुटुंबाला, मित्रांना आणि पूर्ण देशाला अत्यंत कठीण स्थितीत नेईल.

महत्त्वाच्या बातम्या

coronavirus ; कोरोनामुक्त रुग्ण म्हणाला, 'अग्निपरिक्षा पार पडली'

अबब! कोरोनाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने खजिना उघडला; रक्कम ऐकून थक्क व्हाल

'रात्री ८ वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी आहे का?'

…तर महाराष्ट्रात ‘ही’ वेळ येऊ नये यासाठी वेळीच सावध व्हा; अजित पवारांचा इशारा

‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ऐकत नाही मग जनतेने का ऐकावं?’

 

 

Web Title: Coronavirus: Painful! Take 500 rupees and go home; Workers Forced To Walk Back To Native In Rajasthan pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.