आता पाकिस्ताननंही भारताला दिली मदतीची ऑफर; म्हणाला- व्हेंटिलेटरसह आवश्यक सामान पाठवायला तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 04:39 PM2021-04-25T16:39:00+5:302021-04-25T16:41:31+5:30

हा प्रस्ताव पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय लोकांप्रती एकतेची भावना दाखविल्यानंतर आला आहे... (CoronaVirus Pakistan)

CoronaVirus Pakistan offers relief materials to india to help fight corona virus | आता पाकिस्ताननंही भारताला दिली मदतीची ऑफर; म्हणाला- व्हेंटिलेटरसह आवश्यक सामान पाठवायला तयार

आता पाकिस्ताननंही भारताला दिली मदतीची ऑफर; म्हणाला- व्हेंटिलेटरसह आवश्यक सामान पाठवायला तयार

Next

इस्लामाबाद - पाकिस्तानने स्वतःच्या देशातील कोरोना संकट सोडून आता भारताला मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्रालयाने एक निवेदन जारी करत म्हटले आहे, की ते भारताला व्हेंटिलेटर, डिजिटल एक्सरे मशीन आणि पीपीई किटसह अनेक आवश्यक वस्तू निर्यात करण्यासाठी तयार आहेत. काही दिवसांपूर्वी इमरान खान यांनीही ट्विट करत भारतातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकी दर्शवली होती. (CoronaVirus Pakistan offers relief materials to india to help fight corona virus)

आम्ही आवश्यक सामान पाठविण्यासाठी तयार - पाकिस्तान
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे, की आम्ही या कोरोना काळात भारतीय नागरिकांसोबत एकिच्या भावणेने कोरोनाविरोधातील लढाईत वापरले जाणारे काही विशेष साहित्य पाठविण्यासाठी तयार आहोत. एवढेच नाही, तर दोन्ही देश जागतीक महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी पुढे पुरवठ्यासंदर्भात सहकार्याच्या संभाव्य पद्धतीं शोधू शकतात, असेही या निवेदनात म्हटले आहे.

कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?
 
इम्रान खान यांनी ट्विट करत दिला होता एकतेचा संदेश -
हा प्रस्ताव पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय लोकांप्रती एकतेची भावना दाखविल्यानंतर आला आहे. खान म्हणाले होते, की आपल्याला मानवतेपुढे उभ्या राहिलेल्या या जागतिक संकटाचा सामना एकत्रितपणे करावा लागेल. इमरान यांनी म्हटले होते, की ते, आपले शेजारी आणि जग या महामारीच्या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडावे, यासाठी प्रार्थना करत आहेत.

कोरोना संकट; भारताला मदत न करण्यावरून वादात सापडलेल्या अमेरिकन सरकारनं अखेर तोंड उघडलं, म्हणाले...

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही व्यक्त केली सहानुभूती - 
याशिवाय पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनीही भारतीयांप्रति शनिवारी सहानुभूती व्यक्त केली. कुरेशी म्हणाले, की कोविड-19 संकट सांगते, की मानवी प्रश्नांवर राजकारणापलिकडे जाऊन पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

ते म्हणाले, 'कोविड-19 संक्रमणाने आपल्या भागात कहर केला आहे. सध्याच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारतीयांप्रति समर्थन व्यक्त करतो. तसेच पाकिस्तानातील कोलांच्या वतीने, मी भारतात प्रभावित कुटुंबीयां प्रति सहानुभूती व्यक्त करतो.'  ते म्हणाले, या महामारीचा सामना करण्यासाठी पाकिस्तान सार्क देशांच्या सोबतीने काम करत आहे.

CoronaVirus: संकट काळात अमेरिकेनं फिरवली पाठ, तर भारताच्या 'या' खास मित्रानं पुढे केला मदतीचा हात!

अशी आहे पाकिस्तानातील स्थिती - 
पाकिस्तानात शनिवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 157 जणांचा कोरोना संक्रमणाने मृत्यू झाला. तर 5,908 नवे रुग्ण समोर आले. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, संक्रमणामुळे एका दिवसात होणाऱ्या मृत्यूंचा हा आकडा गेल्या वर्षानंतरचा सर्वात मोठा आकडा आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने म्हटले आहे,  की 157 पैकी 53 रुग्णांनी व्हेंटीलेटरवर असतानाच अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानात कोरोनामुळे आतापर्यंत 16,999 जणांचा मृत्यू झाला आहे, तर तर एकूण 7,90,016 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Web Title: CoronaVirus Pakistan offers relief materials to india to help fight corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.