Coronavirus: कोरोनाच्या संकटातही पाकिस्तानचा संधीसाधूपणा, पण भारतीय सैन्यानं दिलं चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 12:44 PM2020-04-08T12:44:26+5:302020-04-08T12:44:47+5:30
सिंग यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत याबाबत माहिती दिली. कोरोना संकटाच्या काळातही पाकिस्तानकडून सातत्याने घुसकोरी करण्याचा प्रयत्न होत आहे
श्रीनगर - राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या पाच हजाराहून अधिक आहे. यातील हजारपेक्षा अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यातल्या आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. केंद्र सरकारच्या आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन निर्णय घेतला. मात्र रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ६० टक्क्यांहून अधिक जण मुंबईतले आहेत. देशात एकीकडे कोरोनाविरुद्धची लढाई सुरू आहे, तर दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानकडून नेहमीप्रमाणे संधीसाधूपणा करण्यात येत आहे.
जम्मू काश्मीर पोलीसचे महासंचालक दिलबाग सिंग यांनी म्हटलंय की, देशात कोरोना व्हायरसमुळे संकट असतानाही पाकिस्तानकडून सीमारेषेवर घुसकोरी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दोन दिवसांपर्वीच सीमारेषेवर चकमकीत सैन्याचे ५ जवान शहीद झाले आहेत. तर, याच संख्येएवढ्या आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलीस, सैन्य आणि केंद्रीय सुरक्षा पथकांसह सर्वच भारतीय फोर्स पाकिस्ताने कुटील कारस्थान उधळून लावण्यास सज्ज आहे.
सिंग यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत याबाबत माहिती दिली. कोरोना संकटाच्या काळातही पाकिस्तानकडून सातत्याने घुसकोरी करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, भारतीय सैन्य पाकिस्तानचं हे कारस्थान उधळून टाकत आहे. डीजीपी सिंह म्हणाले की, भारतीय सैन्य आणि सर्वच सुरक्षा फोर्स पाकिस्तानशी दोनहात करण्यास सज्ज आहेत. सध्या कोविड १९ संवेदनशील परिस्थितीत आहे, आपण सद्यस्थिती पाहता अधिक सावधान आणि तत्पर राहण्याची गरज आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्यायला हवी, असेही सिंगं यांनी म्हटले.