CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाने भारतीयांच्या आयुष्यातील दोन वर्षे कमी केली; नवा स्टडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 12:46 PM2021-10-23T12:46:17+5:302021-10-23T12:59:39+5:30

CoronaVirus decrease life: कोरोना महामारीला दोन वर्षे होत त्याने केलेले दूरगामी परिणामही आता दिसू लागले आहेत.

CoronaVirus Pandemic reduced life expectancy at birth in India by two years: study | CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाने भारतीयांच्या आयुष्यातील दोन वर्षे कमी केली; नवा स्टडी

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाने भारतीयांच्या आयुष्यातील दोन वर्षे कमी केली; नवा स्टडी

Next

कोरोनाने (corona) जगभरातील लाखो कुटुंबांचे भविष्य नष्ट केले आहे. कोणाचा मुलगा, कोणाचा पती, कोणाचा बाप, भाऊ, बहीण असे आप्तेष्ठ कोरोनाने हिरावले आहेत. कोरोना महामारीला दोन वर्षे होत त्याने केलेले दूरगामी परिणामही आता दिसू लागले आहेत. एका आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार कोरोनाने भारतीयांची दोन वर्षे कमी केली आहेत. 

इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ पॉपुलेशन स्‍टडीज (IIPS) नुसार 2019 मध्ये भारतीय पुरुषांचे सरासरी आयुष्य हे 69.5 वर्षे होते. 2020 मध्ये कमी होऊन ते 67.5 वर्षांवर आले आहे. याचप्रमाणए महिलांचे आयुष्य हे 72 वर्षे होते ते आता 69.8 वर्षांवर आले आहे. IIPS चे असिस्टंट प्रोफेसर सुर्यकांत यादव यांचा हा स्टडी बीएमसी पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये छापून आला आहे. 

गेल्या दोन वर्षांत 35 ते 69 वर्षे वयोगटामध्ये मृत्यूदर जास्त होता. त्याचा परिणाम या आकडेवारीवर झाला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यूदर कमालीचा वाढला आहेय मार्च 2020 ते आतापर्यंत चार लाख मृत्यू झाले आहेत. डेटा स्पेशालिस्टनी भारतात यापेक्षा कित्येक पटींनी जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. 

IIPS स्‍टडी मध्ये 145 देशांमधील 
स्‍पेन में 2.28 साल तक कम हो गई जिंदगी ग्‍लोबल बर्डन ऑफ डिसिज (GBD) विचारात घेतला आहे. याशिवाय कोविड इंडिया अॅप्लिकेशन प्रोग्रॅम इंटरफेस पोर्टलद्वारे देखील अभ्यास करण्यात आला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यूदरात मोठी वाढ झाल्याचे यामध्ये दिसले आहे. या तुलनेत भारत मध्यावर आहे. इग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशांत हे आयुष्य 1 वर्षाने घटले आहे. तर स्पेनमध्ये सर्वाधिक 2.28 वर्षांची घट झाली आहे.

Read in English

Web Title: CoronaVirus Pandemic reduced life expectancy at birth in India by two years: study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.