तिसऱ्या लाटेपूर्वीच 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या पालकांना टोचली जाणार लस; असा आहे योगींचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 06:01 PM2021-05-24T18:01:43+5:302021-05-24T18:05:03+5:30
उत्तर प्रदेश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पूर्णपणे तयार आहे. आपण सर्वांनीच ट्रेस आणि टेस्टच्या माध्यमाने कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी गोंडा येथे भेट दिली. यावेळी त्यांनी, देवीपाटनमधील जिल्ह्यांच्या समीक्षेसोबतच येथील कोविड कमाण्ड सेंटर, कोविड हास्पिटलचेही निरीक्षण केले. याच बरोबर त्यांनी गहू खरेदी केंद्राचीही माहिती घेतली. यावेळी, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर भाष्य करताना, ही लाट येण्यापूर्वीच विशेष अभियान राबवून 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या पालकांचे लसीकरण करण्यात येईल, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. (Parents of children under 12 years of age will be vaccinated before the third wave said Yogi Adityanath)
मुख्यमंत्री योगी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, देशभरात कोरोनाविरोधात पंतप्रधानांच्या नेतृत्वात जी लढाई सुरू झाली, आता त्याचे चांगले परिणाम येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पूर्णपणे तयार आहे. आपण सर्वांनीच ट्रेस आणि टेस्टच्या माध्यमाने कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. आता राज्यात रोज तीन लाखहून अधिक टेस्ट होत आहेत.
योगी म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी राज्यातील 36 जिह्यांत एकही व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड नव्हता. आजच्या स्थितीत सर्वच जिल्ह्यांत ऑक्सिजन आणि व्हेटिलेटर आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुले संपूर्ण राज्यात 80 हजार व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. ते म्हणाले, तिसरी लाट येण्यापूर्वीच प्रत्येक मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाला 100 बेड अतिरिक्त उपलब्ध करून दिले जातील. तसेच यावेळी त्यांनी लोक प्रतिनिधींना आपल्या भागातील कोरोना रुग्णालयांना दत्तक घेण्याचेही निर्देश दिले आहेत.
जनपद गोंडा में पत्रकार बंधुओं से वार्ता... https://t.co/4YfwWYVM30
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 24, 2021
याच बरोबर, व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंगच्या माध्यमाने, बहराइच, बलरामपूर आणि श्रावस्ती येथील जिल्हाधिकाऱ्यांसोबत कोरोना स्थितीचा आढावा घेत, कोरोना टेस्टिंगदर आणि लसीकरणाचा वेग वाढवावा, असे निर्देशही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.