मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हताश बापाची विनवणी; माझ्या मुलाला ताप आहे, मला कोरोना झालाय तरीही...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 11:35 AM2020-07-18T11:35:07+5:302020-07-18T11:45:45+5:30
कर्नाटकातील धक्कादायक प्रकार: मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर जोरजोरात ओरडून तो मी आजारी आहे, माझ्या मुलालाही ताप आला आहे. मी कोरोना संक्रमित आहे असं सांगण्यात आलं, मला बेडही मिळाला नाही असं ओरडून सांगत असल्याने मुख्यमंत्री निवासस्थानी असलेला स्टाफ अलर्ट झाला.
बंगळुरु – सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. कर्नाटकातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशातच बंगळुरुमधील एक व्यक्ती कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या घराबाहेर पोहचून गोंधळ करु लागला. जोरजोरात रडत त्याने मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. या व्यक्तीचा मुलगा आजारी होता, आणि त्यांना कोणत्याही प्रकारे उपचार मिळत नव्हते. त्याच्या पत्नीची आणि मुलीची कोरोना टेस्टही केली नव्हती.
व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या या रुग्णाने सांगितले की, त्याला दोन मुले आहेत. ४ किमी पायपीट करुन तो आणि त्याचं कुटुंब मुख्यमत्र्यांच्या घराबाहेर पोहचले. मला अद्याप कोणतीही उपचारासाठी मदत मिळाली नाही म्हणून त्याने मुख्यमंत्र्यांकडे मदतीची याचना केली. कोणतंही रुग्णालय त्याला दाखल करुन घेण्यास तयार नाही असा आरोप त्याने केला.
मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर जोरजोरात ओरडून तो मी आजारी आहे, माझ्या मुलालाही ताप आला आहे. मी कोरोना संक्रमित आहे असं सांगण्यात आलं, मला बेडही मिळाला नाही असं ओरडून सांगत असल्याने मुख्यमंत्री निवासस्थानी असलेला स्टाफ अलर्ट झाला. त्यानंतर तातडीने या रुग्णासाठी रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आणि जनरल रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.
बनाशंकरी येथे राहणाऱ्या शंकरने सांगितले की, तो मूळचा दावानगरे येथे राहणारा आहे. तो मेडिकल कॉलेजमध्ये बस ड्रायव्हर म्हणून काम करतो, सोमवारी त्याला अचानक ताप आला, त्याने मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी केली पण त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. गुरुवारी सकाळी फोन करुन त्याला सांगितले की, तुमचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर त्याने आरोग्य विभागाच्या हेल्पलाईनवर कॉल केल्यानंतरही कोणतीही मदत मिळाली नाही.
एका छोट्या रुममध्ये शंकर त्यांच्या कुटुंबासह राहतो, त्याठिकाणी तो स्वत:ला आयसोलेट करु शकत नाही. त्याच्या ५ वर्षाच्या मुलालाही ताप आला आहे. १० महिन्याची मुलगी आणि मुलाबद्दल त्याला चिंता वाटत आहे. शहरात शंकर याचे कोणीही नातेवाईक नाही, वारंवार मदत मागूनही त्याला कोणतीही मदत झाली नाही. आतापर्यंत त्याने मुलांचे आणि पत्नीची कोरोना टेस्ट केली नाही.
दरम्यान, एका ऑटोरिक्षातून ते पोलीस ठाण्यात गेले, त्याठिकाणी मदत मागितली पण तिथून ओरडून परत पाठवण्यात आले, ते म्हणाले रुग्णालयात जा, पण रुग्णालयात कोणीही दाखल करुन घेतले नाही, अखेर एका मुलाला खांद्यावर घेत पत्नी मुलीसह त्याने ४ किमी पायपीट केली आणि मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर पोहचला. त्याठिकाणी त्याने मदतीची याचना केली तेव्हा तात्काळ मुख्यमंत्री निवासस्थानातील कर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर त्याला रुग्णालयात दाखल करुन घेतलं.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
…तर राज्याच्या आरोग्य यंत्रणेला आणखी काय हवं?; देवेंद्र फडणवीसांचं शिवसेनेकडून तोंडभरुन कौतुक
लेहसोबत आता समुद्रात भारताने दाखवली ताकद; चीनला दिला इशारा
कोरोनावरील आणखी एक लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात; वैज्ञानिकांना मोठं यश
मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर आई अन् मुलीनं स्वत:ला पेटवून घेतलं; विरोधकांनी योगी सरकारला घेरलं