CoronaVirus: चिंताजनक! "आपण थकलो आहोत, कोरोना नाही!" 22 जिल्ह्यांत महिनाभरापासून वाढतायत कोरोना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 05:41 PM2021-07-27T17:41:51+5:302021-07-27T17:43:40+5:30

11 मेपासून सरासरी दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची संख्येत सातत्याने कमी होत आहे. मात्र, याच बरोबर, केंद्राने कोरोनासंदर्भात काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच, आपण थकलो आहोत, पण कोरोना व्हायरस नाही, असेही म्हटले आहे.

CoronaVirus patients have been on the rise for over a month in 22 districts | CoronaVirus: चिंताजनक! "आपण थकलो आहोत, कोरोना नाही!" 22 जिल्ह्यांत महिनाभरापासून वाढतायत कोरोना रुग्ण

CoronaVirus: चिंताजनक! "आपण थकलो आहोत, कोरोना नाही!" 22 जिल्ह्यांत महिनाभरापासून वाढतायत कोरोना रुग्ण

Next

नवी दिल्ली - कोरोना व्हायरस नष्ट व्हायला आणखी बरेच दिवस आहेत. संपूर्ण जगात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. (CoronaVirus patients have been on the rise for over a month in 22 districts)

अग्रवाल म्हणाले, 11 मेपासून सरासरी दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची संख्येत सातत्याने कमी होत आहे. मात्र, याच बरोबर, केंद्राने कोरोनासंदर्भात काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच, आपण थकलो आहोत, पण कोरोना व्हायरस नाही, असेही म्हटले आहे.

CoronaVaccine: प्रतीक्षा संपली! देशात पुढच्या महिन्यात येऊ शकते मुलांची कोरोना लस

लव अग्रवाल म्हणाले, '22 जिल्हे - केरलमध्ये- 7, मणिपूरमध्ये - 5, मेघालयात - 3 आणि इतर, जेथे गेल्या 4 आठवड्यात कोरोना व्हायरस रुग्ण संख्येत वृद्धी नोंदवण्यात आली आहे. हे चिंतेचे कारण आहे.' देशात अद्यापही 62 जिल्हे असे आहेत, जेथे रोजच्या रोज 100 हून अधिक कोरोना रुग्ण समोर येत आहेत. हे रुग्ण या जिल्ह्यांच्या स्थानिक आणि मर्यादित क्षेत्रातूनच समोर आले आहेत, असेही ते म्हणाले.

अग्रवाल म्हणाले, कोरोना रुग्ण संखेत घट होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हा काळजीचा विषय आहे. 'साप्ताहीक सरासरीनुसार, कोविड-19 रुग्णसंख्येत सातत्याने घट दिसून आली आहे. मात्र, ही रुग्ण संख्या कमी होण्याच्या दराची तुलना आधीपासून आतापर्यंत केली, तर यात आलेली कमी, हा चिंतेचा विषय आहे. यासंदर्भात आम्ही राज्यांशीही चर्चा करत आहोत.

Web Title: CoronaVirus patients have been on the rise for over a month in 22 districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.