coronavirus: होय, 475 रुपयात किराणा सामान घरपोच द्या, जिल्हाधिकाऱ्यांचे दुकानदारांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 03:46 PM2020-03-25T15:46:21+5:302020-03-25T15:46:57+5:30
जगभरातील शक्तिशाली देश प्रयत्न करून कसे असहाय झाल्याचे आणि आरोग्यतज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीचा हवाला देत तमाम भारतवासीयांना ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.
मुंबई - कोरोना विषाणूंच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे (सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक दुरावा), घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असे कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर, किराणा दुकान आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानी एकच झुंबड उडाली. स्थानिक प्रशासनाकडून याबाबत खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यात येत आहेत.
जगभरातील शक्तिशाली देश प्रयत्न करून कसे असहाय झाल्याचे आणि आरोग्यतज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीचा हवाला देत तमाम भारतवासीयांना ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही भाजीपाला, किराणा दुकानात नागरिकांच मोठी गर्दी होताना दिसून येतंय. या गर्दीचा फायदा घेत काही किराणा दुकानदार आणि व्यापाऱ्यांकडून चढ्या दराने मालाची विक्री होत आहे. नागरिकांच्या तशा तक्रारीही आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अयोध्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी भन्नाट आयडिया केली आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी घरपोच किराणा सामान पोहोचविण्याच जबाबदारी किराणा दुकानदारांना दिली आहे. विशेष म्हणजे जादा दराने विक्री होऊ नये म्हणून ११ वस्तूंची यादीही प्रशासनाने संबंधित दुकानदारांना दिली आहे. त्यानुसार ४७५ रुपयात ११ सामानांची पिशवी नागरिकांच्या घरपोच देण्यात येत आहे.
अयोध्या जिला मजिस्ट्रेट ने किराना दुकानदारों को रोजमर्रा की जरूरत के 11 सामान की पैकेजिंग कर होम डिलीवरी करने को कहा गया है इन 11 सामानों की कीमत 475 रुपये तय की गई है। इससे ज्यादा कीमत वसूल करने वालों के खिलाफ कार्रवाई की जाएगी। ये आदेश 2 अप्रैल तक लागू रहेगा।#Coronaviruspic.twitter.com/9QAaEL9O1a
— ANI_HindiNews (@AHindinews) March 25, 2020
अयोध्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २ एप्रिलपर्यंत हा नियम आणि सेवा सुरूच राहणार आहे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम घेणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.