coronavirus: कोरोनाविरोधात यशस्वी ठरत असलेल्या Pfizer Vaccine ची भारतात असेल एवढी किंमत

By बाळकृष्ण परब | Published: November 11, 2020 04:12 PM2020-11-11T16:12:00+5:302020-11-11T16:15:35+5:30

Pfizer Vaccine News : फायझर आणि बायोनटेकच्या (Pfizer Vaccine) कोरोनावरील लसीबाबत आरोग्य जगताला खूप अपेक्षा आहेत. आता या लसीच्या किमतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

coronavirus: Pfizer Vaccine, which is successful against coronavirus, has the same price in India | coronavirus: कोरोनाविरोधात यशस्वी ठरत असलेल्या Pfizer Vaccine ची भारतात असेल एवढी किंमत

coronavirus: कोरोनाविरोधात यशस्वी ठरत असलेल्या Pfizer Vaccine ची भारतात असेल एवढी किंमत

googlenewsNext
ठळक मुद्दे फायझरच्या या लसीची किंमत खूप जास्त असण्याची शक्यता फायझरने आपल्या या लसीची किंमत ही ३९. डॉलर ( प्रत्येक डोसासाठी १९.५ रुपये) एवढी ठेवली आहेत्यामुळे ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होणे खूप कठीण दिसत आहे

नवी दिल्ली - फायझर आणि बायोनटेकच्या (Pfizer Vaccine) कोरोनावरील लसीबाबत आरोग्य जगताला खूप अपेक्षा आहेत. आता या लसीच्या किमतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार फायझरच्या या लसीची किंमत खूप जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होणे खूप कठीण दिसत आहे.

फायझर आणि बायोनटेकच्या लसीच्या यशस्वीतेबाबत खूप अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते फायझरची लस ही कोरोनाविषाणूविरोधात यश मिळवणारी पहिली लस ठरेल. फायझरने आपल्या या लसीची किंमत ही ३९. डॉलर ( प्रत्येक डोसासाठी १९.५ रुपये) एवढी ठेवली आहे. तर mRNA लसीवर काम करत असलेल्या मॉडर्नाने लसीची किंमत ही ३७ डॉलर एवढी ठेवली आहे. आता या लसीची भारतात किती किंमत असेल याची माहिती घेण्यात येत आहे.

युरोपिय महासंघ, जपान, अमेरिका आणि ब्रिटन यांनी फायझरसोबत कोरोनावरील लसीसाठी करार केला आहे. या करारांतर्गत त्यांना २०२१ पर्यंत १.३ बिलीयन लसी मिळण्याची शक्यता आहे. तर भारतीय लस निर्मात्या कंपन्या आणि सरकारने फायझरसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही.

तसेच डब्ल्यूएचओची लस विकसित करत असलेल्या COVAX  सोबतही कुठलाही करार करण्यात आसलाना नाही. खरेदीपेक्षा फायझरच्या अल्ट्रा कोल्ड व्हॅक्सिनसाठी सर्वात मोठं आव्हान साठवण असेल. फायझरच्या mRNA लसीला उणे ७० ते उणे ८० डिग्री तापमानामध्ये वाहतूक करून नेणे आवश्यक आहे. सर्वसाधारण फ्रीजमध्ये ही लस २४ ते ४८ तासांत खराब होऊ शकते.

फायझरची लस ही भारतातील उष्ण वातावरणात फारशी उपयुक्त असेल असं वाटत नाही. अशा परिस्थितीत विकसित देशांना अल्ट्रा कोल्ड चेनच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे आवश्यक असेल. सध्या भारताकडे सुमारे २७ हजार कोल्ड चेन पॉईंट्स आहेत. हे २ ते आठ डिग्रीपर्यंत प्रशितन पुरवतात. काही कोल्ड चेन इफ्रास्ट्रक्चर विशिष्ट्य औषधांसाठी उणे ३० डिग्रीपर्यंत काम करतात. एकूण कोल्ड चेन इफ्रापैकी ९० टक्के कृषीमाल साठलवण आणि केवळ १० टक्के औषधांच्या आवश्यकतेसाठी वापरले जाते.

Web Title: coronavirus: Pfizer Vaccine, which is successful against coronavirus, has the same price in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.