Coronavirus : पिझ्झा पडला महागात; डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण, 72 घरं क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 12:21 PM2020-04-16T12:21:33+5:302020-04-16T12:25:48+5:30
Coronavirus : पिझ्झा मागवणं काही लोकांना चांगलंच महागात पडलं आहे.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 11,000 हून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर मोदी यांनी देशभरात 3 मेपर्यंत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे. याच दरम्यान पिझ्झा मागवणं काही लोकांना चांगलंच महागात पडलं आहे.
एका पिझ्झामुळे अनेकांचा जीव धोक्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी दिल्लीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह निघाल्यामुळे येथील तब्बल 72 घरातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिझ्झा डिलिव्हरी बॉय मार्चमध्ये काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली. याबाबत माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती मिळवली आणि त्यांना क्वारंटाईन केले आहे.
A pizza boy has been detected with #COVID19 here. 17 other delivery boys linked with him have been placed under institutional quarantine and 72 people have been placed under home quarantine: Delhi Health Minister Satyendar Jain https://t.co/X7fbrA4hwspic.twitter.com/5c9aCftNXV
— ANI (@ANI) April 16, 2020
डिलिव्हरी बॉयने दक्षिण दिल्लीमधील अनेक विभागात पिझ्झा डिलिव्हर केला होता. त्यामुळे येथील अनेक लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दक्षिण दिल्लीचे डीएम बीएम मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सध्या या पिझ्झा डिलिव्हर बॉयच्या संपर्कात आलेली 72 घरं क्वारंटाईन करण्यात आली आहेत. आतापर्यंत यातील कोणाची कोरोना चाचणी केली नाही. यामधील जर त्यांच्याध्ये कोरोनाची काही लक्षणं दिसली तर त्याची आम्ही कोरोना चाचणी करू.' सध्या रुग्णालयात डिलिव्हरी बॉयवर उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Coronavirus : बापरे! बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी, 3000 जणांवर गुन्हा दाखलhttps://t.co/HZ1CquYe08#CoronavirusLockdown#coronaupdatesindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 16, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : बापरे! बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी, 3000 जणांवर गुन्हा दाखल
Coronavirus : हरियाणाचा नवरदेव अन् मेक्सिकन नवरी, लॉकडाऊनमधल्या एका लग्नाची गोष्ट!
Coronavirus : केंद्र व राज्य सरकारी कार्यालये सोमवारपासून पुन्हा सुरू होणार
Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून 'मिथेनॉल' प्यायले अन्...
Coronavirus : 'देशातील 400 जिल्हे कोरोनामुक्त, पुढचे 2-3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे'