CoronaVirus: बिहारमध्ये PM केअर्समधील २५ व्हेंटिलेटर ९ महिनांपासून धूळखात; एकदाही वापर नाही!  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 10:59 AM2021-05-19T10:59:47+5:302021-05-19T11:01:35+5:30

CoronaVirus: बिहारमधील दरभंगा येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर PM केअर्स फंडातून आयसीयू सेटअपसह २५ व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले होते.

coronavirus pm cares ventilators not used for last 9 months in darbhanga bihar | CoronaVirus: बिहारमध्ये PM केअर्समधील २५ व्हेंटिलेटर ९ महिनांपासून धूळखात; एकदाही वापर नाही!  

CoronaVirus: बिहारमध्ये PM केअर्समधील २५ व्हेंटिलेटर ९ महिनांपासून धूळखात; एकदाही वापर नाही!  

Next
ठळक मुद्देबिहारमध्ये PM केअर्समधील २५ व्हेंटिलेटर ९ महिनांपासून धूळखातदरभंगा येथील बाब उघडकीसव्हेंटिलेटर्स न वापरण्याचे कारण काय?

दरभंगा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचित कमी होताना दिसत असली, तरी कोरोनामुळे वाढती मृत्यूंची संख्या चिंताजनक ठरत चालली आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. केंद्राकडून राज्यांना शक्य ती मदत केली जात असतानाही बिहारमधील दरभंगा येथून धक्कादायक माहिती समोर येत आहे. PM केअर्समधून देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स धूळखात पडले असून, गेल्या ९ महिन्यांत त्याचा एकदाही वापर केला गेला नसल्याचे सांगितले जात आहे. (coronavirus pm cares ventilators not used for last 9 months in darbhanga bihar)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन यांच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत. मात्र, बिहारमधील दरभंगा येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर PM केअर्स फंडातून आयसीयू सेटअपसह २५ व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले होते. मात्र, हे सर्व व्हेंटिलेटर्स धूळखात पडले असून, गेल्या ९ महिन्यांपासून एकदाही वापरले नसल्याची माहिती मिळाली आहे. 

बिहारमध्ये कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू, पण ७८९ जणांवर अंत्यसंस्कार!; हायकोर्टही हैराण 

व्हेंटिलेटर्स न वापरण्याचे कारण काय?

PM केअर्समधून व्हेंटिलेटर्स आले असतानाही त्याचा वापर का गेला नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावर डीएमसीएचचे अधीक्षक डॉ. मणि भूषण यांनी प्रतिक्रिया दिली. आयसीयू सेटअपसह व्हेंटिलेटर्स मिळाले, ही बाब सत्य आहे. या व्हेंटिलेटर्सना वापरासाठी तयार करण्यात येत होते. मात्र, ड्राय-रन प्रक्रिया यशस्वीरित्या सुरू होत नसल्यामुळे हे व्हेंटिलेटर्स वापरले नाहीत, असे भूषण म्हणाले. तसेच या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आले आहेत. ड्राय-रन प्रक्रियेची चाचणी पुन्हा करण्यात येत असून, लवकरच हे व्हेंटिलेटर्स सुरू होऊन वापरात येतील, असे विश्वास भूषण यांनी व्यक्त केला आहे. 

चिंतेत भर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांनी गमावला जीव; बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू

रुग्णांसाठी धोकादायक ठरले असते

ड्राय-रन प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे असते. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू झाली नाही, तर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी ड्राय-रन प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू झाल्याशिवाय व्हेंटिलेटर्स न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही भूषण यांनी सांगितले. 

राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६७ हजार ३३४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, ३ लाख ८९ हजार ८५१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तसेच गेल्या २४ तासांत ४ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १८ कोटी ५८ लाख ०९ हजार ३०२ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 
 

Web Title: coronavirus pm cares ventilators not used for last 9 months in darbhanga bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.