coronavirus: लॉकडाउनवर पंतप्रधानांची आज सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा; महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणाची भूमिका महत्त्वाची
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 06:08 AM2020-05-11T06:08:38+5:302020-05-11T06:10:27+5:30
देशव्यापी ‘लॉकडाउन’ लागू झाल्यापासून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची ही पाचवी बैठक असेल.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोमवारी दुपारी ३ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी लॉकडाउननंतर काय करायचे, यावर चर्चा करणार आहेत. आताचे निर्बंध १७ मे रोजी संपत असून, त्यानंतर ते वाढवावेत की मागे घ्यावेत, यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.
देशव्यापी ‘लॉकडाउन’ लागू झाल्यापासून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची ही पाचवी बैठक असेल. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. स्थलांतरित मजुरांचा आपापल्या गावी जाण्याचा प्रश्न अडचणीचा होऊन बसला आहे आणि लवकरात लवकर उद्योग, व्यवसाय सुरू व्हावेत यासाठी चर्चा करण्यात येईल.
...तर पुढची वाटचाल
कोरोना लगेच संपणार नाही, त्याचा आणखी काही काळ सामना करावाच लागेल. त्यासाठी व्यवहार अमर्यादित काळ बंद ठेवता येणार नाही.
हे जनतेने ओळखले, यापुढे अधिक काळजी घेतली आणि एकूणच जीवनशैली बदलली, तर लॉकडाउन मागे घेऊन पुढील वाटचाल करता येईल, अशी केंद्राची भूमिका आहे.