CoronaVirus News: आधी टाळ्या, थाळ्या, मग पणती, मेणबत्ती; आज कोणता नवा टास्क देणार पंतप्रधान मोदी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 14:33 IST2020-05-12T14:31:12+5:302020-05-12T14:33:57+5:30
पंतप्रधान मोदी आज रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार

CoronaVirus News: आधी टाळ्या, थाळ्या, मग पणती, मेणबत्ती; आज कोणता नवा टास्क देणार पंतप्रधान मोदी?
नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपणार आहे. लवकरच संपणारा लॉकडाऊन आणि देशातील कोरोनाबाधितांची संख्या या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे आज मोदी काय नेमकं काय बोलणार, असा प्रश्न देशवासीयांना पडला आहे. कालच मोदींनी देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी तब्बल सहा तास चर्चा केली होती. त्यात काही मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली होती.
याआधी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशाला संबोधित केलं आहे. मोदींनी कोरोनाबद्दल देशवासीयांना सर्वप्रथम संबोधित करताना जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी टाळ्या, थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर मोदींनी देशातल्या कोरोना योद्ध्यांसाठी पणती, मेणबत्ती पेटवण्याचं आवाहन केलं. त्यामुळे आज पंतप्रधान देशवासीयांना काय सांगणार, कोणतं नवं आवाहन करणार, याबद्दल अनेकांना उत्सुकता वाटत आहे. देशातल्या कोरोना योद्ध्यांना सलाम करण्यासाठी मोदी नवं आवाहन करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज जागतिक परिचारिका दिन आहे. या निमित्तानं पंतप्रधान मोदी कोरोना विरोधातल्या लढ्यात योगदान देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करू शकतात. याआधी मोदींनी अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. 'टाळ्या, थाळ्या, पणती, मेणबत्ती या सगळ्यांनी भावनांना जन्म दिला असून त्यामुळेच प्रत्येक नागरिकानं काही ना काही करण्याचा निश्चय केला आहे. प्रत्येकाला यातून प्रेरणा मिळाली आहे,' असं मोदींनी म्हटलं होतं. देशातली जनता कोरोना विरुद्धची लढाई लढतेय. जनतेच्या सोबतीनं शासन, प्रशासन लढतंय. देशातला प्रत्येक नागरिक कोरोना विरुद्धच्या लढाईतला सैनिक असून तोच या लढ्याचं नेतृत्त्व करत असल्याचंही मोदींनी म्हटलं होतं.
पंतप्रधान मोदी आज रात्री देशवासीयांशी संवाद साधणार; मोठी घोषणा होणार?
देशातील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता; पण आता बरंच काही बदलणार?
आता परिवहन मंत्री अनिल परब यांना सरकार अटक करणार का?; भाजपाचा सवाल
लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा
चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप