CoronaVirus : नरेंद्र मोदींचा १०६ वर्षीय माजी आमदाराला फोन, कोरोनावर मात करण्यासाठी मागितला आशीर्वाद!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 02:58 PM2020-04-22T14:58:02+5:302020-04-22T15:08:41+5:30

CoronaVirus : उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील नौरंगिया विधानसभेचे माजी आमदार नारायण यांच्याशी नरेंद्र मोदी यांनी फोनवरून चर्चा केली.

CoronaVirus : PM Modi calls former 106 year old MLA Narayan rkp | CoronaVirus : नरेंद्र मोदींचा १०६ वर्षीय माजी आमदाराला फोन, कोरोनावर मात करण्यासाठी मागितला आशीर्वाद!

CoronaVirus : नरेंद्र मोदींचा १०६ वर्षीय माजी आमदाराला फोन, कोरोनावर मात करण्यासाठी मागितला आशीर्वाद!

Next
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी सतत विविध क्षेत्रातील लोकांसोबत चर्चा करत आहेत.नरेंद्र मोदी यांनी कुशीनगर जिल्ह्यातील १०६ वर्षीय माजी आमदार नारायण यांच्याशी फोनवरून संवाद साधला.गुजरातमधील ९९ वर्षीय माजी आमदार रतनभाई थम्मर यांच्याशी नरेंद्र मोदी यांनी फोनवर चर्चा केली होती.

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत विविध क्षेत्रातील लोकांसोबत चर्चा करत आहेत. यातच नरेंद्र मोदी यांनी कुशीनगर जिल्ह्यातील १०६ वर्षीय माजी आमदार नारायण यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील नौरंगिया विधानसभेचे माजी आमदार नारायण यांच्याशी नरेंद्र मोदी यांनी फोनवरून चर्चा केली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी माजी आमदार नारायण यांच्या तब्येतीची विचारपूस केली. माजी आमदार नारायण १०६ वर्षांचे असून त्यांनी जनसंघच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.

माजी आमदार नारायण यांना फोनवर नरेंद्र मोदी म्हणाले, "तुम्ही १०० वर्षे पाहिली आहेत. मला वाटले की, अशा संकटाच्या काळात आपला आशीर्वाद घेऊ. तुमच्याकडून जे काही शिकलो आहे, ते देशाच्या कामासाठी आले. हे चांगले आहे." तसेच, तुम्ही स्वस्थ राहा आणि देशाचे नेतृत्व करा, असे नरेंद्र मोदींना माजी आमदार नारायण यांनी यावेळी म्हटले.

याआधी गुजरातमधील ९९ वर्षीय माजी आमदार रतनभाई थम्मर यांच्याशी नरेंद्र मोदी यांनी फोनवर चर्चा केली होती. कोरोना संकटावर मात करण्यासाठी माजी आमदार रतनभाई थम्मर यांनी ५१ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे. गेल्या सोमवारी नरेंद्र मोदी यांनी रतनभाई यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच, कोरोनाचा संकटाचा सामना करण्यासाठी दिलेल्या मदतनिधीसाठी आभार व्यक्त केले. रतनभाई थम्मर हे १९७५-१९८० च्या दरम्यान आमदार होते.

दरम्यान, भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ९८४ वर पोहचली आहे. तर ६४० जणांचा मृत्यू झाला आहे. १५ हजार ४७४ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ३८७० लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. तसेच गेल्या १५ तासांत देशभरात कोरोनामुळे ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर १३८३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे ६१० जणांनी कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वीपणे दिला असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आता ३००० हून अधिक लोकांनी कोरोनावर मात करून ही लढाई जिंकली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
 

Web Title: CoronaVirus : PM Modi calls former 106 year old MLA Narayan rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.