CoronaVirus News: कोरोनाच्या निर्मूलनासाठी आपत्कालीन योजना राबवा; पंतप्रधानांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 04:46 AM2020-06-14T04:46:42+5:302020-06-14T06:44:42+5:30

साथीच्या स्थितीचा पंतप्रधानांकडून आढावा

CoronaVirus PM modi orders to Implement emergency plans to eradicate corona | CoronaVirus News: कोरोनाच्या निर्मूलनासाठी आपत्कालीन योजना राबवा; पंतप्रधानांचे आदेश

CoronaVirus News: कोरोनाच्या निर्मूलनासाठी आपत्कालीन योजना राबवा; पंतप्रधानांचे आदेश

Next

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या निर्मूलनासाठी राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने आपत्कालीन योजना आखाव्यात, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना शनिवारी दिले. पावसाळा सुरू झाला असून या मोसमात येणारे इतर आजार लक्षात घेऊन त्यादृष्टीनेही आरोग्यसुविधा सज्ज ठेवाव्यात, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

देशातील कोरोना साथीच्या सद्यस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही ज्येष्ठ मंत्री व सनदी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला असे पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या तीन लाखांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्लीसह विविध राज्यांमध्ये कोरोना साथीची स्थिती कशी आहे, प्रत्येक राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध किती प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत, किती उद्योगधंदे सुरू झाले अशा सर्व गोष्टींची सविस्तर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत घेतली.

रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
देशातील दोन तृतीयांश कोरोना रुग्ण हे पाच राज्यांत आहेत. त्यात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. महानगरांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठे आहे अशी माहिती या बैठकीत मंत्री व सनदी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. देशामध्ये कोरोना रुग्णांची दोन लाखांची संख्या अवघ्या दहा दिवसांत तीन लाखांपर्यंत वाढलीे. श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांमधून काही लाख स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यात आले. त्या मोहिमेची माहितीही पंतप्रधानांनी या बैठकीत घेतल्याचे समजते.

Web Title: CoronaVirus PM modi orders to Implement emergency plans to eradicate corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.