CoronaVirus News: पॅकेज जाहीर करताना मोदींनी दोन नवे शब्द खुपदा वापरले; नेटकऱ्यांनी मोजून दाखवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 11:43 AM2020-05-13T11:43:36+5:302020-05-13T11:45:15+5:30
CoronaVirus News: पंतप्रधान मोदींच्या संबोधनात दोन शब्दांचा विशेष उल्लेख
नवी दिल्ली: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल आर्थिक पॅकेजची घोषणा केली. संकट हीच संधी मानून देशाला स्वावलंबी करण्याचा निश्चय यावेळी मोदींनी व्यक्त केला. २१ वं शतक भारताचं असेल असं म्हटलं जात होतं. त्यामुळे कोरोना संकटाकडे आपण संधी म्हणून पाहायला हवं, असं मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात दोन नवे शब्द वापरले. या शब्दांवर त्यांचा विशेष भर होता.
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी मोदींनी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. यामुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास व्यक्त करत मोदींनी या पॅकेजचा उल्लेख 'आत्मनिर्भर भारत' असा केला. मोदींनी त्यांच्या ३० मिनिटांच्या संबोधनात स्वावलंबनावर भर दिला. 'कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारनं याआधी केलेल्या घोषणा, रिझर्व्ह बँकेनं घेतलेले निर्णय आणि आता जाहीर करण्यात आलेलं पॅकेज यांचा एकूण विचार केल्यास ते एकूण २० लाख कोटींचं होतं. हा आकडा देशाच्या जीडीपीच्या १० टक्के इतका आहे,' असं मोदी म्हणाले.
आर्थिक पॅकेजमुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. आत्मनिर्भर आणि आत्मनिर्भरता या दोन शब्दांवर मोदींचा विशेष भर होता. मोदींनी त्यांच्या संबोधनात आत्मनिर्भर शब्द १९ वेळा, तर आत्मनिर्भरता शब्द ७ वेळा वापरला. यावेळी मोदींनी कोरोना संकट आणि त्यामुळे भारत करत असलेलं पीपीई आणि मास्कचं उत्पादन यांचा संदर्भ दिला. कोरोना संकटापूर्वी देशात पीपीई किट्सचं उत्पादन होत नव्हतं. एन-९५ मास्कचं उत्पादन नाममात्र होतं. मात्र आता आपण दिवसाकाठी दोन लाख पीपीई आणि एन-९५ मास्कची निर्मिती करत आहोत, असं मोदींनी सांगितलं.
आर्थिक पॅकेजमधून कोणाला काय मिळणार; अर्थमंत्री संध्याकाळी महत्त्वाच्या घोषणा करणार
मोदींकडून लॉकडाऊन सुरु ठेवण्याचे संकेत; १७ मेनंतर 'असा' असेल देश?
…म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!
...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक
२० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक