CoronaVirus: कोरोना 'बहूरुपी' अन् 'धूर्त'; खुद्द मोदींनीच सांगितलं कधीपर्यंत करावा लागणार व्हायरसचा सामना?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 09:19 AM2021-05-21T09:19:48+5:302021-05-21T09:21:13+5:30

अधिकाऱ्यांशी बोलताना मोदी म्हणाले, कोरना व्हायरसच्या या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे बदलते स्वरूप वयस्क आणि मुलांसाठी आव्हान बनले आहे.

CoronaVirus PM Narendra Modi comment on coronavirus said it is Cunning | CoronaVirus: कोरोना 'बहूरुपी' अन् 'धूर्त'; खुद्द मोदींनीच सांगितलं कधीपर्यंत करावा लागणार व्हायरसचा सामना?

CoronaVirus: कोरोना 'बहूरुपी' अन् 'धूर्त'; खुद्द मोदींनीच सांगितलं कधीपर्यंत करावा लागणार व्हायरसचा सामना?

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचे वर्णन ‘‘बहुरूपी आणि धूर्त’’ असे केले आहे. ते म्हणाले, तो आपले रूप बदलण्यात तरबेज आहे. तो मुले आणि तरुणांना प्रभावित करणारा आहे. मोदींनी गुरुवारी कोरोनाचा सामना करण्यासाठी नवी रणनीती आणि नवे समाधान शोधण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला. तसेच, कोरोना छोट्या स्थरावर जरी असला तरी, आव्हान संपणार नाही, असेही मोदी म्हणाले. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने महाराष्ट्र, छत्‍तीसगड, हरियाणा, केरळ, ओडिशा, पदुचेरी, राजस्‍थान, उत्‍तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेशचे जिल्हाधिकारी तथा स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते. (CoronaVirus PM Narendra Modi comment on coronavirus said it is Cunning)

तत्पूर्वी, मंगळवारीही त्यांनी काही इतर राज्यांतील जिल्हाधिकारी आणि स्तानिक पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह काही राज्यांत कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

Myucormicosis: म्युकरमायकोसिसला साथरोग जाहीर करा; केंद्रीय आरोग्य खात्याची राज्यांना सूचना

अधिकाऱ्यांशी बोलताना मोदी म्हणाले, कोरना व्हायरसच्या या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे बदलते स्वरूप वयस्क आणि मुलांसाठी आव्हान बनले आहे. तसेच, राज्य प्रशासनाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यांतून कोरोनाच्या गांभिर्याशी संबंधित आकडे गोळा करण्यास सांगण्यात आले आहे. जेनेकरून ते भविष्यात गरज पडल्यास कामी येतील.

मोदी म्हणाले,  गत काळातील महामारी असोत वा कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली सध्य स्थिती, प्रत्येक महामारीने आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे. ‘‘महामारीचा सामना करण्याच्या आपल्या पद्धतींत सातत्याने बदल, सातत्याने नाविन्य अत्यंत महत्वाचे आहे. हा व्हायरस आपले रूप बदलण्यात तर्बेज आहे. अथवा तो बहुरूपी आणि धूर्तदेखील आहे, असेही म्हणता येईल. व्हायरस म्यूटेशन तरुण आणि मुलांना प्रभावित करणारा आहे. यामुळे, याचा सामना करण्यासाठी आपली रणनीती आणि पद्धतही विशेष असायला हवी,’’ असेही मोदी म्हणाले.

Coronavirus: दिलासादायक! जुलैपर्यंत देशात कोरोनाची दुसरी लाट संपण्याची शक्यता, परंतु त्यानंतर...

मोदी म्हणाले, ‘‘या नव्या आव्हानात नवी रणनीती आणि नव्या समाधानाची आवश्यकता आहे. गेल्या काही दिवसांत देशातील कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, जोवर छोट्या स्वरुपातही हे संक्रमण आहे. तोवर आव्हाण कायम आहे. सध्यातरी, कोरोनापासून बचावासंदर्भातील नियमांचे पालन करणे, हाच या आजारापासून बचाव करण्याचा सर्वात शक्तीशाली पर्याय आहे. 

Web Title: CoronaVirus PM Narendra Modi comment on coronavirus said it is Cunning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.