Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वामित्व योजनेची घोषणा, गावागावांना होणार जबरदस्त फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 01:35 PM2020-04-24T13:35:02+5:302020-04-24T14:33:54+5:30
ग्रामस्थांनी 'दोन यार्ड' म्हणजेच ६ फुटांचं अंतर राखावं, असं आवाहनही मोदींनी गावकऱ्यांना केलं आहे.
नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटानं देशासमोर मोठी समस्या निर्माण केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व ग्रामपंचायतीच्या प्रमुखांना संबोधित केले. पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी नवीन ई-गाव स्वराज पोर्टल आणि अॅप लाँच केले. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा प्रश्न, त्यासंबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वामित्व योजनेचीही घोषणा केली आहे. पंतप्रधान म्हणाले की, कोरोना संकटाच्या वेळी गावकऱ्यांनी जगाला मोठा संदेश दिला आहे. ग्रामस्थांनी 'दोन यार्ड' म्हणजेच ६ फुटांचं अंतर राखावं, असं आवाहनही मोदींनी गावकऱ्यांना केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी स्वामित्व योजना केली सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी मोदींनी स्वामित्व योजनेचीदेखील सुरुवात करत असल्याची त्यांना माहिती दिली. 5 ते 6 वर्षांपूर्वी देशातील फक्त १०० पंचायती ब्रॉडबँडने जोडल्या गेल्या होत्या, परंतु आज ही सुविधा सव्वा लाख पंचायतींपर्यंत पोहोचली आहे.
जी संकेतस्थळं सुरू करण्यात आली आहेत, त्या माध्यमातून गावागावांत माहिती पोहोचवणे आणि गावात मदत करणे वेगवान होणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वामित्व योजनेच्या माध्यमातून संपूर्ण गावातल्या मालमत्तेचे ड्रोनद्वारे ऑडिट केले जाणार असून, त्यानंतर स्वामित्वचे प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे गावांमध्ये मालमत्तेच्या मालकीवरून जे वाद सुरू आहेत, ते संपुष्टात येणार आहेत.The Coronavirus pandemic has taught that we have to become self-dependent: Prime Minister Narendra Modi during interaction with Sarpanchs from across the nation via video conferencing. #PanchayatiRajDiwaspic.twitter.com/ydWhD9vyGh
— ANI (@ANI) April 24, 2020
तसेच मालमत्तेचं स्वामित्व असल्यानं बँकेकडून कर्ज घेता येणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटकसह ६ राज्यांत ही योजना सुरू केली जात आहे. त्यानंतर या योजनेत सुधारणा करून ती संपूर्ण देशात लागू केली जाणार आहे. कोरोनासंदर्भात गावांनी जी खबरदारी घेतलेली आहे, ती वाखाणण्याजोगी आहे. प्रत्येकानं ’दोन यार्डाचे अंतर’ पाळण्याचं आवाहनही पंतप्रधान मोदींनी पंचायत सदस्यांशी चर्चा करताना केलं आहे.#WATCH The coronavirus pandemic has given its biggest lesson that we have to become self-reliant," Prime Minister Narendra Modi during interaction with Sarpanchs from across the nation via video conferencing. #PanchayatiRajDiwaspic.twitter.com/lK9qX3mBSq
— ANI (@ANI) April 24, 2020