Coronavirus: सात गोष्टींसाठी साथ द्या; कोरोनाला हरवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सांगितली 'सप्तपदी'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 10:48 AM2020-04-14T10:48:41+5:302020-04-14T12:07:58+5:30
कोरोनावर मात करण्यासाठी सात गोष्टींना साथ देण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे.
नवी दिल्ली: देशात लागू असलेला ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. राज्य सरकारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्तम काम केलं आहे. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून योगदान दिलं आहे. मात्र तरीही कोरोना पसरतो आहे. कमीत कमी नुकसान व्हावं, लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी राज्यांसोबत चर्चा केली. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची घोषणा मोदींनी केली आहे. तसेच कोरोनासारख्या महामारीविरुद्ध लढा देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला सात गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
CoronaVirus: 20 एप्रिलनंतर 'या' ठिकाणचा लॉकडाऊन शिथील होईल, पण...; पंतप्रधानांचे महत्त्वाचे संकेत
India to remain in lockdown till May 3, announces PM Modi
— ANI Digital (@ani_digital) April 14, 2020
Read @ANI Story | https://t.co/TpyrKLv1l5pic.twitter.com/GDAPI3eZxU
कोरोनावर मात करण्यासाठी सात गोष्टींना साथ देण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे.
१. नरेंद्र मोदी यांनी घरात असणाऱ्या जेष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याची विनंती केली आहे.
२. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मण रेषेचं काटेकोर पालन करा.
३. नागरिकांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयद्वारे दिले जाणाऱ्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी केले आहे.
४. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'आरोग्य सेतू' हे मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची विनंती नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केली आहे. तसेच इतरांना देखील हे अॅप घेण्यास प्रेरित करा असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
५. सभोवताली असणाऱ्या गरिबांना शक्य असल्यास मदत करा. गरिबांच्या जेवणाची जमल्यास व्यवस्था करा अशी विनंती नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
६ .तुमचा व्यवसाय आणि उद्योगात तुमच्यासोबत काम करत असलेल्या सहकाऱ्यांविषयी सहवेदना ठेवा, त्यांना कामावरुन काढून टाकू नका असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
७. कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या नर्सेस, डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार यांचा सन्मान करा असं आवाहन देखील नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
While making new guidelines, we have kept in mind the interests of the poor and daily wage workers. Harvesting of Rabi crops is also underway. Central Govt and state Govts are working together to ensure that farmers face minimal problems: PM Modi #COVID19pic.twitter.com/Z9Se34DlbH
— ANI (@ANI) April 14, 2020
I urge people to respect corona warriors - doctors, nurses,
— ANI (@ANI) April 14, 2020
sweepers & police personnel. Please be kind to people who work with you in your business & industry. Don't terminate your employees: Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/Le5MP7Z4x6
PM's 7 pleas
— BJP (@BJP4India) April 14, 2020
1. Take care of the elderly
2. Strictly follow guidelines of lockdown
3. Increase immunity, follow Ayush ministry guidelines
4. Download Arogya Setu App
5. Help poor families
6. Don't take away jobs of your employees
7. Respect Corona warriors#IndiaFightsCoronapic.twitter.com/3hfsqNIUjt
देशवासियांचे मानले आभार
'सर्व देशवासियांच्या त्यागामुळे भारताने आतापर्यंत कोरोनाशी अत्यंत मजबुतीने दोन हात केले आहेत, मोठं नुकसान टाळलं आहे. जनतेने त्रास सहन करुन आपल्या देशाला वाचवलं आहे. अनेकांना त्रास सहन करावा लागला, कुणाला खाण्याची अडचण, कुणाला जाण्या-येण्याची अडचण, काही जण घरापासून दूर आहेत. पण प्रत्येक जण आपलं कर्तव्य पार पाडत आहे. सर्वांना आदरपूर्वक नमन करतो. आपल्या संविधानात आम्ही भारतीय लोक याचा उल्लेख आहे, ती हिच गोष्ट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या सामूहिक शक्तीचा संकल्प ही खरी आदरांजली आहे', असं म्हणत मोदींनी आदरांजलीही वाहिली.
बाबा साहेब डॉक्टर भीम राव आंबेडकर की जन्म जयंती पर, हम भारत के लोगों की तरफ से अपनी सामूहिक शक्ति का ये प्रदर्शन,ये संकल्प, उन्हें सच्ची श्रद्धांजलि है: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी pic.twitter.com/0rIob5phb4
— ANI_HindiNews (@AHindinews) April 14, 2020