coronavirus: देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांपार, पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 09:52 PM2020-06-12T21:52:08+5:302020-06-13T02:39:11+5:30

देश अनलॉक करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

coronavirus: PM will interact with CMs of 21 states/UT on June 16 | coronavirus: देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांपार, पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करणार

coronavirus: देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांपार, पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करणार

Next

नवी दिल्ली - सुमारे सव्वा दोन महिने चाललेल्या लॉकडाऊननंतर देश अनलॉक करण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू झालेली असतानाच देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे गंभीर आव्हान आरोग्य यंत्रणा आणि सरकारसमोर उभे राहिले आहे. दरम्यान, देश अनलॉक करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.  यावेळी पंतप्रधान आणि विविध राज्यांच्या मु्ख्यमंत्र्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा होऊन कोरोनाला रोखण्यासाठीची पुढील रणनीती ठरण्याची शक्यता आहे.

१६ आणि १७ जून रोजी होणाऱ्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब, आसाम, केरळ, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, नागालँड, मेघालय, पुदुच्चेरी, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करतील. तसेच चंदिगड, लडाख, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार, दमण दीव आणि लक्षद्विप या केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होतील.  तसेच १७ जून रोजी नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील.



दरम्यान, देशामध्ये काल पहिल्यांदाच एका दिवसामध्ये कोरोनाचे १० हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. काल एकूण १० हजार ९५६ रुग्ण सापडले असून, ३९६ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र देशातील रुग्णांचा रिकव्हरी रेट चांगला आहे हीच काहीशी दिलासा देणारी बाब आहे. दरम्यान देशात कोरोनामुळे आतापर्यंत ८ हजार ४९८ जणांचा मृत्यू झाला आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

काश्मीर खोऱ्यातील हिंदूना शस्रे पुरवा, माजी पोलीस महासंचालकांचा सल्ला

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

जबरदस्त! LOCवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका, १० चौक्या केल्या उद्ध्वस्त

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली 

Web Title: coronavirus: PM will interact with CMs of 21 states/UT on June 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.