Coronavirus: कौतुकास्पद! कर्तव्य बजावतानाच पोलिसानं रस्त्यावर उघडली शाळा अन् मुलांना देतोय शिक्षणाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 08:48 AM2020-05-05T08:48:16+5:302020-05-05T09:01:02+5:30

विशेष म्हणजे पोलीस सामाजिक कर्तव्य बजावतानाच सामाजिक जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडत आहेत.

Coronavirus: police constable sets up school for economically weak brother and sister vrd | Coronavirus: कौतुकास्पद! कर्तव्य बजावतानाच पोलिसानं रस्त्यावर उघडली शाळा अन् मुलांना देतोय शिक्षणाचे धडे

Coronavirus: कौतुकास्पद! कर्तव्य बजावतानाच पोलिसानं रस्त्यावर उघडली शाळा अन् मुलांना देतोय शिक्षणाचे धडे

googlenewsNext
ठळक मुद्देदेशभरात कोरोनानं हाहाकार माजवलेला असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारेही प्रयत्नशील आहेत. देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून, अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, नर्स आणि पोलीस अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. रस्त्यावर उतरून पोलीस ड्युटी करतानाचं चित्र अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे.

रुद्रपूर: देशभरात कोरोनानं हाहाकार माजवलेला असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारेही प्रयत्नशील आहेत. अनेक राज्यांनी कोरोनाला थोपवण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी  केली आहे. देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून, अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, नर्स आणि पोलीस अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. रस्त्यावर उतरून पोलीस ड्युटी करतानाचं चित्र अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे.

विशेष म्हणजे पोलीस सामाजिक कर्तव्य बजावतानाच सामाजिक जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडत आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करणे, तर कुठे लोकांना अन्न पुरवणं, अशी  समाजोपयोगी कामेही पोलीस करत आहेत. उत्तराखंडमधील रुद्रपुरातूनही असंच एक चित्र समोर आलं आहे. उत्तराखंडमधल्या ४६व्या पीएसी रुद्रपूरमध्ये तैनात कॉन्स्टेबलची शिक्षणाची आवड पाहता त्यानं  रस्त्यावरच शाळा सुरू केली आहे.

हा पोलीस कॉन्स्टेबल फोटोत एका गरीब भाऊ व बहिणीला शिकवत असल्याचं पाहायला मिळतं आहे. उत्तराखंडचे मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटर या पोलिसाचा फोटो पोस्ट केला असून, त्याचं कौतुकही केलं आहे. १२ तास कर्तव्य बजावणारा हा पोलीस खुर्चीवर बसून दोन मुलांनाही शिक्षणाचे धडे देत आहे. त्याची ही कामगिरी खरंच कौतुकास्पदच आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: दारू महागली! 'या' राज्यात मद्यावर ७० टक्के अतिरिक्त कर लागणार

६०० कोटींची उलाढाल लॉकडाऊनमुळे थंडावली; देशातील आर्थिक घडामोडी ठप्प

राज्यात कोरोनाचे १४ हजार ५४१ रुग्ण; मुंबईतील बाधितांची संख्या ९,३१०

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाची रहस्यमय माहिती असलेली चीनमधील प्रसिद्ध 'बॅट वुमन' अचानक गायब

फेसबुकनंतर जिओचा आणखी एक मोठा करार; अमेरिकेच्या 'या' कंपनीसोबत मिळवला हात

Web Title: Coronavirus: police constable sets up school for economically weak brother and sister vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.