CoronaVirus News: कडाक्याच्या उन्हात मजुरांना रस्त्यावर लोटांगण घालण्याची शिक्षा; पोलिसांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 04:46 PM2020-05-19T16:46:52+5:302020-05-19T16:51:45+5:30

CoronaVirus News: घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कारवाई

CoronaVirus up police taking action against 2 policemen after hapur incident video goes viral kkg | CoronaVirus News: कडाक्याच्या उन्हात मजुरांना रस्त्यावर लोटांगण घालण्याची शिक्षा; पोलिसांवर होणार कारवाई

CoronaVirus News: कडाक्याच्या उन्हात मजुरांना रस्त्यावर लोटांगण घालण्याची शिक्षा; पोलिसांवर होणार कारवाई

Next

लखनऊ: कडाक्याच्या उन्ह्यात पोलिसांनी प्रवासी मजुरांना रस्त्यावर लोटांगण घालण्याची शिक्षा दिल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातल्या हापुड जिल्ह्यात घडला आहे. हे प्रवासी मजूर रेल्वे रुळांच्या बाजूनं त्यांच्या गावी पायी निघाले होते. त्यावेळी एका फाटकाजवळ पोलिसांनी त्यांना रोखलं. मजुरांनी मास्क घातले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांनी रस्त्यावर लोटांगण घालण्याची शिक्षा दिली. कडाक्याच्या उन्ह्यात तापलेल्या रस्त्यावर मजुरांना लोटांगण घालायला लावून पोलिसांनी त्यांना काठ्यांनी मारहाण केली.
 
पोलिसांनी मजुरांना दिलेली अमानुष शिक्षा आणि त्यांना केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. कडाक्याच्या उन्हात मजुरांना रस्त्यावर लोटांगण घालायला लावणाऱ्यांमध्ये पोलीस शिपायाचा आणि होमगार्डचा समावेश आहे.

लॉकडाऊनमध्ये उद्योगधंदे ठप्प असल्यानं हातावर पोट असलेल्या लाखो मजूर आणि कामगारांचे हाल होत आहेत. उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्यानं मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झालेले मजूर त्यांच्या गावी परतत आहेत. सरकारनं मजुरांसाठी श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. मात्र तरीही अनेक मजूर मिळेल त्या वाहतुकीच्या साधनानं गावाकडे निघाले आहेत. कित्येक मजूर पायी जात आहेत. या मजुरांचे प्रचंड हाल होत असून काही ठिकाणी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना अपघात झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. 

"दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी केलं होतं मिरची हवन"

कोरोनासंदर्भात विरोधकांची मोठी बैठक; उद्धव ठाकरे अन् ममतांसह 15 पक्षाचे नेते होणार सहभागी

मोदींना पत्र लिहिणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरेंनाही पत्र पाठवावं; फडणवीसांचा टोला

उमेदवारीवरुन एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणतात...

Web Title: CoronaVirus up police taking action against 2 policemen after hapur incident video goes viral kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.