CoronaVirus Positive News : पुण्यातील ' नोव्हा लीड ' कंपनीला कोरोनावरील औषधाच्या मानवी चाचणीला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 06:05 PM2020-05-21T18:05:59+5:302020-05-21T18:21:10+5:30

ही मानवी चाचणी यशस्वी झाल्यास भारतासाठी मोठे यश मानले जाईल.

CoronaVirus Positive News : Pune-based Nova Lead Company approves human testing of drug on corona | CoronaVirus Positive News : पुण्यातील ' नोव्हा लीड ' कंपनीला कोरोनावरील औषधाच्या मानवी चाचणीला मान्यता

CoronaVirus Positive News : पुण्यातील ' नोव्हा लीड ' कंपनीला कोरोनावरील औषधाच्या मानवी चाचणीला मान्यता

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्यासह देशभरातील विविध शहरांतील १०० कोरोनाबाधित रुग्णांवर ही चाचणी होणार मानवी चाचणीला परवानगी मिळालेली देशातील ही केवळ दुसरी कंपनीप्रत्येक रुग्णावर २१ दिवस चाचणी सुरू राहणार

पुणे : पुण्यातील 'नोव्हा लीड 'फार्मा कंपनीच्या औषधांची कोरोनाबााधित रुग्णांवर चाचणी घेण्यास ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने मान्यता दिली आहे. पुढील तीन-चार आठवड्यात या चाचण्या सुरू होणार असून त्याचे प्रत्यक्ष परिणाम समोर येण्यास तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रित देशपांडे यांनी दिली. पुण्यासह देशभरातील विविध शहरांतील १०० कोरोनाबाधित रुग्णांवर ही चाचणी होणार आहे.
कोरोना बाधित रुग्णांतील विषाणुचा संसर्ग कमी करण्यासाठी कंपनीचे औषध अधिक प्रभावी असल्याचा दावा नोव्हालीड कंपनीने केला आहे. हे औषध बाजारात आधीपासूनच विक्रीला उपलब्ध आहे. पण या औषधाचे नाव कंपनीकडून प्रसिध्द करण्यात आलेले नाही. सध्या या औषधाला 'एनएलपी २१' हा कोड देण्यात आला आहे. औषधाचे नाव किंवा कोणत्या आजारासाठी हे औषध वापरात आहे, हे सांगतिल्यास लोक खरेदीसाठी गर्दी करतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. मागील काही वर्षांपासून हे औषध वापरात असून शरीरावर कोणतेही घातक परिणाम दिसत नाही. प्रयोगशाळेमध्ये कोरोनासाठी या औषधाच्या चाचण्या घेतल्यानंतर इतर औषधांपेक्षा त्याचा परिणाम अधिक वेगाने व प्रभावीपणे होत असल्याचे दिसून आल्याचा दावा कंपनीने केली, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रित देशपांडे यांनी दिली.
देशपांडे म्हणाले, मानवी चाचणीला परवानगी मिळालेली देशातील ही केवळ दुसरी कंपनी आहे. कंपनीच्या औषधामुळे संसर्ग कमी होण्याबरोबरच पेशींची स्थितीही सुधारते. पुढील ३ ते ४ आठवड्यांमध्ये या औषधांची मानवी चाचणी सुरू होईल. पुण्यातील एका खासगी रुग्णालयासह देशातील विविध शहरांतील पाच रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा पुरवठा सुरू असलेल्या एकुण १०० रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे.  प्रत्येक रुग्णावर २१ दिवस चाचणी सुरू राहील. त्यामुळे पुढील तीन-चार महिने ही चाचणी चालेल. या चाचणी परिणामकारक ठरेल, याची खात्री आहे.
दरम्यान, सध्या हायड्रॉक्सीक्लारोक्वीन, फॅविपिरेविर, रिटोनेविर आदी औषधांचा बाधित रुग्णांच्या उपचारासाठी वापर केला जात आहे. या औषधांपेक्षा एनएलपी२१ अधिक प्रभावशाली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे ही मानवी चाचणी यशस्वी झाल्यास भारतासाठी मोठे यश मानले जाईल.

Web Title: CoronaVirus Positive News : Pune-based Nova Lead Company approves human testing of drug on corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.