Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी टॅक्सी ड्रायव्हर ठरला देवदूत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 11:15 AM2020-04-19T11:15:31+5:302020-04-19T11:21:43+5:30
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. तसेच वेळप्रसंगी काही स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 16,000 हून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. याचदरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. तसेच वेळप्रसंगी काही स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत. अशीच एक घटना गुरुग्राममध्ये घडली आहे.
एका गर्भवती महिलेसाठी टॅक्सी ड्रायव्हर देवदूत ठरला आहे. लॉकडाऊनमुळे एक गर्भवती महिला अडकून पडली होती. त्यावेळ गुरुग्राममधील एका टॅक्सी ड्रायव्हरने महिलेला आपल्या घरी 21 दिवस राहण्यासाठी जागा दिल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर लॉकडाऊन पुन्हा वाढवला गेल्यानंतर त्याने कर्फ्यू पास तयार करून महिलेला जयपूरला तिच्या घरी सुखरुपरित्या सोडलं आहे. संजय असं टॅक्सी ड्रायव्हरचं नाव असून तो गुरुग्राममध्ये राहतो.
Coronavirus : धोका वाढला! देशात एका दिवसात 2154 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 16,000 वरhttps://t.co/JEpm0x7CrJ#CoronaUpdatesInIndia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 19, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमधून 8 महिन्यांची एक गर्भवती महिला उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे गेली होती. मात्र लॉकडाऊनमुळे ती गुरुग्राममध्ये जाऊन अडकली होती. तेव्हा महिला ज्या टॅक्सीमध्ये बसली होती त्या टॅक्सी ड्रायव्हरने 21 दिवस महिलेसह तिच्या मुलीला आसरा दिला आहे. गर्भवती महिलेला आणि मुलीला पाहून परिसरात प्रश्नही विचारले जातील पण माणुसकीच्या नात्यानं त्यांना घरी घेऊन आलो असल्याची माहिती संजयने दिली. गेल्या 21 दिवसांपासून सुहाना सिंह आणि त्यांची मुलगी घरी राहिल्या. त्यांना जेवण दिलं तसेच रुग्णालयात नेल्याचं देखील सांगितलं.
Coronavirus : बापरे! भाजीवाल्याला कोरोनाची लागण, तब्बल 2,000 जण क्वारंटाईनhttps://t.co/tZt1ULeyY8#CoronaUpdatesInIndia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 19, 2020
'टॅक्सी ड्रायव्हरने आमची खूप मदत केली. जेव्हा पैसे संपले तेव्हा भागातील एका व्यक्तीकडे मदत मागितली. त्याने मदत केली आणि कर्फ्यू पासही करून दिला. त्यानंतर आम्हाला घरी सोडलं' असं गर्भवती महिलेने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेसाठी पोलीस देवदूत ठरले होते. दिल्लीत एका महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्या होत्या. त्यावेळी तिच्या कुटुंबियांनी मदतीसाठी अनेक ठिकाणी फोन केला. रुग्णवाहिकेच्या क्रमांकावर कॉल केल्यानंतर उत्तर मिळालं नाही. शेवटी त्यांनी मदतीसाठी पोलिसांना फोन केला. फोन येताच तातडीने पोलीस महिलेच्या घरी दाखल झाले आणि तिला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल केलं. महिलेने एका मुलीला जन्म दिला आहे. पोलिसांनी महिलेला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने महिला आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : धोका वाढला! देशात एका दिवसात 2154 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 16,000 वर
Coronavirus : बापरे! भाजीवाल्याला कोरोनाची लागण, तब्बल 2,000 जण क्वारंटाईन
CoronaVirus: दिलासादायक! ४५ जिल्ह्यांमध्ये नवा रुग्ण नाही
CoronaVirus: ‘ऑक्सफर्ड’ सप्टेंबरअखेरपर्यंत आणणार कोरोनाची लस?