coronavirus: राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाचा संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 12:41 PM2020-08-13T12:41:03+5:302020-08-13T12:50:00+5:30
नृत्यगोपाल दास हे गोकुळाष्टमी निमित्त मथुरा येथे आले होते. मात्र येथे असतानाच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर तत्काळ त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.
मथुरा - राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नृत्यगोपाल दास यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली, त्यामध्ये त्यांना कोगोनाचा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले. सध्या नृत्यगोपाल दास यांना ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला आहे. ते सध्या मथुरा येथे असून, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक तैनात करण्यात आलेले आहे.
दरम्यान, महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त समजताच योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्यगोपाल दास, त्यांचे सहकारी आणि मथुरेच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तसेच योगी आदित्यनाथ यांनी मेदांता हॉस्पिटलचे डॉक्टर नरेश त्रेहान यांच्याशीसुद्धा चर्चा केली असून, महंत नृत्यगोपाल दास यांना उपचारांसाठी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात नेण्याची तयारी करण्यात आली आहे.
नृत्यगोपाल दास हे गोकुळाष्टमी निमित्त मथुरा येथे आले होते. मात्र येथे असतानाच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर तत्काळ त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळ्यापूर्वी अयोध्येतील रामलल्लाचे दोन पुजारी हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. तसेच अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. तसेच मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले होते.
देशातील कोरोना संसर्गाचा वेग आणखी वाढला
देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या 24 तासात तब्बल 66 हजार नवीन रुग्ण आढळून आले असून आजपर्यंत एकाच दिवसात आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचा हा सर्वाधित आकडा आहे. त्यामुळे, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23,96,638 वर जाऊन पोहोचली आहे. भारतात गेल्या 24 तासात 66,999 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, 942 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 23,96,638 पर्यंत पोहोचला आहे. त्यापैकी, 16,95,982 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 6,53,622 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आत्तापर्यंत 47,033 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी