coronavirus: सार्वजनिक प्रवासी वाहतूक लवकरच सुरू होणार, नितीन गडकरींनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 08:33 PM2020-05-06T20:33:52+5:302020-05-06T20:39:18+5:30

गेल्या दीड महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली सार्वजनिक प्रवासी वाहतूक नियमावलीसह परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे.

coronavirus: Public transport will start soon, hints given by Nitin Gadkari BKP | coronavirus: सार्वजनिक प्रवासी वाहतूक लवकरच सुरू होणार, नितीन गडकरींनी दिले संकेत

coronavirus: सार्वजनिक प्रवासी वाहतूक लवकरच सुरू होणार, नितीन गडकरींनी दिले संकेत

Next
ठळक मुद्देसार्वजनिक प्रवासी वाहतूक लवकरच सुरू होऊ शकते. त्यासाठी नियमावली तयार केली जात आहेसध्या केवळ केवळ ग्रीन झोनमध्येच बस आणि कारच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली आहेवाहतूक आणि महामार्ग खुले करणे हा सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकते

नवी दिल्ली - देशासमोरील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असतानाच थांबलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योगधंद्यांना काही निर्बंधांसह परवानगी देण्यात आली आहे. आता गेल्या दीड महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली सार्वजनिक प्रवासी वाहतूक नियमावलीसह परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी तसे संकेत दिले आहेत.

सार्वजनिक प्रवासी वाहतूक लवकरच सुरू होऊ शकते. त्यासाठी नियमावली तयार केली जात आहे, असे नितीन गडकरी यांनी बस आणि कार वाहतूकदारांच्या संघटनेला संबोधित करताना सांगितले. सध्या केवळ केवळ ग्रीन झोनमध्येच बस आणि कारच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली आहे. या संदर्भातील वृत्त नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित झाले आहे. 

वाहतूक आणि महामार्ग खुले करणे हा सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकते . मात्र बस आणि कारमधून वाहतूक सुरू झाल्यानंतर स्वच्छता आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अनिवार्य असेल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

coronavirus: कोरोनामुळे संकटात रोजगार, या योजनेंतर्गत दोन वर्षे खात्यात पैसे जमा करणार मोदी सरकार

coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह

भारतासाठी मोठी बातमी...कोरोनावरील ३० लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत; वैज्ञानिकांची मोदींना माहिती
 

वाहन मालकांच्या समस्यांची मला जाणीव आहे आणि त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी हरप्रकारे मदत केली जाईल, असे आश्वासनही गडकरींनी दिले.  तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाचे संधीमध्ये रूपांतर करा, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, ३ मे रोजी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपल्यानंतर देशातील कोरोनाबाधित भागांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये विभागणी करून काही सवलती देण्यात आल्या आहेत. कोरोनाचे रेड झोनमध्ये काही प्रमाणात बंधने कायम आहेत. मात्र ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बहुतांश व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. तसेच देशभरात अडकलेल्या मजुरांसाठी विशेष रेल्वे आणि बस फेऱ्याही चालवल्या गेल्या आहेत.  

Web Title: coronavirus: Public transport will start soon, hints given by Nitin Gadkari BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.