Coronavirus : ‘…तेव्हाही रेल्वे बंद केली नव्हती, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 11:42 AM2020-03-24T11:42:34+5:302020-03-24T12:00:03+5:30

Coronavirus : दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका हा अधिक असल्याने रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे.

Coronavirus Railways calls upon its rich heritage to request people to stay at home SSS | Coronavirus : ‘…तेव्हाही रेल्वे बंद केली नव्हती, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या’

Coronavirus : ‘…तेव्हाही रेल्वे बंद केली नव्हती, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या’

Next

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. यातच रेल्वे प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. सरकारने रेल्वे पूर्णपणे बंद केली आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका हा अधिक असल्याने रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 500 वर गेली आहे. देशातील 30  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशा संपूर्णत: 'लॉकडाऊनघोषित करण्यात आला आहे. मात्र अद्यापही अनेकांना परिस्थितीचं गांभीर्य समजलेलं नाही म्हणूनच भारतीय रेल्वेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. 

 ‘भारतीय रेल्वे युद्धाच्या काळातही कधी थांबली नव्हती. त्यामुळे कृपया परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या आणि घरीच थांबा असं ट्विट रेल्वेने केलं आहे. रेल्वेचं हे ट्विट अनेकांनी रिट्विट केलं आहे. देशात प्रथमच प्रवासी रेल्वे थांबविण्यात आली आहे. सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. फक्त मालगाड्या चालविण्यास परवानगी आहे. त्यामुळे रेल्वेने लोकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. देशभरात एका दिवसात कोरोनाचे नवीन 103 रुग्ण समोर आले आहेत. तसेच या रोगानं आतापर्यंत 10 जणांना जीव गमवावा लागला आहे. 

महाराष्ट्र, चंदीगडदिल्लीगोवाजम्मू-काश्मीरनागालँड, तामिळनाडू, पंजाब, राजस्थानउत्तराखंडपश्चिम बंगाललडाखझारखंडअरुणाचल प्रदेशबिहारत्रिपुरातेलंगणाछत्तीसगड, हिमाचल प्रदेशआंध्रप्रदेशमेघालयमणिपूर, केरळहरियाणादमण-दीव-दादरा नगर हवेलीपुदुच्चेरीअंदमान-निकोबार बेटगुजरातकर्नाटकआसाम ही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: 'लॉकडाऊनकरण्यात आले आहेत. 

 

जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे कौतुक केले आहे.भारताकडे प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे कोरोनाला रोखणं आता तुमच्या हाती आहे असं म्हणत WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने भारताचं कौतुक केलं आहे. WHO चे कार्यकारी संचालक मायकल जे रायन यांनी भारताचं कौतुक केलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 499 वर पोहचली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून भारताने देशभरातल्या 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित केले आहे. कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी भारत उचलत असलेली पावले कठोर असली तरी ती योग्यच आहेत. या प्रकारची पावलं उचलणं भारताने सुरू ठेवलं पाहिजे असंही WHO ने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

Coronavirus : महाराष्ट्रासह देशातील ‘या’ 30 राज्य-केंद्रशासित प्रदेशात 'लॉकडाऊन'

Coronavirus : कोरोनाला रोखणं आता तुमच्या हाती! WHO ने केलं भारताचं कौतुक

Coronavirus:...मग कोरोनाचे गांभीर्य घालवले कोणी?; शिवसेनेने विचारला पंतप्रधानांना सवाल 

Coronavirus: आईच्या मृत्यूनंतरही डॉक्टरने बजावलं कर्तव्य; कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटला पोहचले 

coronavirus : कोल्हापुरात कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन

Coronavirus : राज्यभर संचारबंदी लागू;जिल्ह्यांच्या सीमाही सील 

 

Web Title: Coronavirus Railways calls upon its rich heritage to request people to stay at home SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.