Coronavirus : कोरोनाग्रस्तांना आणण्यास गेलेल्या आरोग्य पथकावर हल्ला; अँब्युलन्स चालक गेला पळून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 09:32 AM2020-04-14T09:32:45+5:302020-04-14T09:32:56+5:30

अनेक आरोग्य कर्मचारी वेगवेगळ्या भागात जाऊन अशा रुग्णांचा शोध घेत आहेत, पण त्यांच्यावर हल्ले होण्याचे प्रकारसुद्धा वाढीस लागले आहेत.

Coronavirus : ranchi attack on team reached to bring covid 19 patient vrd | Coronavirus : कोरोनाग्रस्तांना आणण्यास गेलेल्या आरोग्य पथकावर हल्ला; अँब्युलन्स चालक गेला पळून

Coronavirus : कोरोनाग्रस्तांना आणण्यास गेलेल्या आरोग्य पथकावर हल्ला; अँब्युलन्स चालक गेला पळून

Next

रांचीः देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं सरकारनं उपाययोजना सुरू केल्या आहेत. गल्लीबोळात असलेल्या कोरोनाग्रस्तांची ओळख पटवण्यासाठी सरकार कसोशीनं प्रयत्न करत आहे. अनेक आरोग्य कर्मचारी वेगवेगळ्या भागात जाऊन अशा रुग्णांचा शोध घेत आहेत, पण त्यांच्यावर हल्ले होण्याचे प्रकारसुद्धा वाढीस लागले आहेत. झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमधला हिंदपिढी भाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. इथे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत असून, आरोग्य कर्मचारीही त्यांची ओळख पटवत आहे.

हिंदपिढीमध्ये काही कोरोनाग्रस्त रुग्णांना आणायला गेलेल्या वैद्यकीय पथकावर स्थानिकांनी  हल्ला केला आहे. त्यांच्यावर दगड आणि विटा फेकून मारल्या आहेत. या भागात तीन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर १३ एप्रिलच्या रात्री आरोग्य पथक हिंदपिढी भागात गेले असता त्यांच्यासोबत संरक्षणासाठी काही पोलीसही उपस्थित होते. या आरोग्य पथकाला स्थानिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. कुर्बान चौकातील लोकांनी लाईट बंद करून कोरोना संक्रमितांना आणण्यास गेलेल्या आरोग्य पथकावर हल्ला केला. मध्यरात्री कोरोना पीडितांना घेऊन जाणं योग्य नाही, त्यासाठी ठरावीक वेळ निर्धारित करायला हवी, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. 

कोरोनाग्रस्तांना आणण्यासाठी गेलेल्या चार रुग्णवाहिकांवर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आल्या. त्यात एका रुग्णवाहिकेचं मोठं नुकसान झालं. हिंदपिढीतील लोकांचा आक्रमक पवित्रा पाहून रुग्णवाहिका चालक अनिल व भेंगरा यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आपला जीव वाचविला. 

यापूर्वीही आरोग्य आणि सफाई कामगारांवर झालेत हल्ले
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मागील तीन दिवसांपासून संपूर्ण हिंदुस्थानावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेचे पथक अहोरात्र कोरोनामुक्त करण्यासाठी आणि हिंदपिढीला आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, परंतु या काळात या आरोग्य कर्मचा-यांसह बेशिस्तपणाच्या बर्‍याच घटना घडत आहेत.

रांचीचे सिव्हिल सर्जन काय म्हणतात..
संपूर्ण घटनेची माहिती देताना रांचीचे सिव्हिल सर्जन व्ही. बी. प्रसाद म्हणाले की, 13एप्रिल रोजी राज्यात ओळखल्या गेलेल्या 5 नवीन कोरोना संक्रमित लोकांपैकी तीन जण हिंदपिढी भागातील होते. माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथक त्या भागात गेले असता, त्यांच्यावर समाजकंटकांकडून हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये एक रुग्णवाहिका देखील खराब झाली. सिव्हिल सर्जन म्हणाले की, पॉझिटिव्ह व्यक्तींपैकी एक रुग्णालयात पोहोचलेला असून, इतर 2 अद्याप हिंदपिढीमध्ये आहेत. 

Web Title: Coronavirus : ranchi attack on team reached to bring covid 19 patient vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.