Coronavirus : कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! केंद्र सरकार थेट खात्यात PF जमा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 03:32 PM2020-03-26T15:32:50+5:302020-03-26T15:32:58+5:30

Coronavirus : कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा देणारी एक घोषणा करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात सरकार पैसे भरणार आहे.

Coronavirus Relief for employers! Govt to bear EPFO contribution SSS | Coronavirus : कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! केंद्र सरकार थेट खात्यात PF जमा करणार

Coronavirus : कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! केंद्र सरकार थेट खात्यात PF जमा करणार

Next

नवी दिल्ली कोरोना व्हायरसने जगाला विळखा घातला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा सातत्याने वाढत असून 600 हून अधिक जणांना त्याची लागण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनामुळे देशातील अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर उद्योगधंदे बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वंकष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. यामध्येच कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा देणारी एक घोषणा करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात सरकार पैसे भरणार आहे. अर्थमंत्र्यांनी गुरुवारी (26 मार्च) पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

 लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे संघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) सरकारकडून योगदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार पुढील तीन महिन्यांसाठी विशिष्ट कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यांमध्ये पैसे भरणार आहे. ‘ज्या कंपन्या अथवा संस्थांमध्ये 100 पेक्षा कमी कर्मचारी आहेत. तसेच या कंपन्या अथवा संस्थांमधील 90 टक्के कर्मचारी हे 15 हजार रुपयांपेक्षा कमी वेतन घेतात अशा कर्मचाऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफ) खात्यात पुढील तीन महिन्यांसाठी कर्मचारी आणि कंपनी यांच्याकडून येणारे प्रत्येकी 12 टक्के याप्रमाणे 24 टक्के रक्कम केंद्र सरकारकडून जमा केली जाईलसअशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

 

 कोरोनामुळे केंद्र सरकारकडून ईपीएफच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत यामुळे कर्मचाऱ्यांना आपला 3 महिन्यांचा पगार किंवा पीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेच्या 75 टक्के आगाऊ रक्कम विनापरतावा काढता येईल. मात्र, यांपैकी जी रक्कम कमी असेल तीच काढता येईल असंही अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. निर्मला सीतारामन यांनी आज दुपारी कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे झालेल्या नुकसानीवरून दिलासा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊन केले आहे. गरीबांसाठी, कामगारांना तात्काळ मदत देण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांना मदत देण्यासाठी 1.7 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत आहे. है पैसे नागरिकांच्या थेट खात्यामध्ये टाकण्यात येतील, असे सीतारामन यांनी सांगितले. 

 

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत हे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, हा उद्देश असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. कोरोना व्हायरसमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मोदी सरकारने तब्बल 1.7 लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज दिले आहे. या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी शिक्कामोर्तब केले. हा निधी तब्बल 10 कोटी लोकांच्या थेट बँक खात्यात वळविला जाणार आहे. तसेच लॉकडाऊनमुळे परिणाम झालेल्या  व्यवसायांना मदत करण्यासाठी वापरला जाईल. 

महत्त्वाच्या बातम्या

Breaking: देशातील गरिबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Coronavirus : जगाला कोरोनाचा विळखा! तब्बल 3 अब्ज नागरिक लॉकडाऊन, 21,300 जणांचा मृत्यू

Coronavirus : स्टेट बँकेच्या खातेधारकांसाठी खूशखबर! घरबसल्या मिळणार ‘ही’ सुविधा

Coronavirus : डॉक्टरलाच झाली कोरोनाची लागण, 1000 रुग्णांना संसर्गाचा धोका

Coronavirus : बापरे! फक्त 20 मिनिटांत एका व्यक्तीमुळे 4 जणांना कोरोनाची लागण  

 

Web Title: Coronavirus Relief for employers! Govt to bear EPFO contribution SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.