CoronaVirus News: पीएम केअर्समधून आतापर्यंत किती रुपये खर्च?; मोदी सरकारनं पहिल्यांदाच दिली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 08:55 AM2020-05-14T08:55:18+5:302020-05-14T09:07:25+5:30

पीएम केअर्समधील जमाखर्चाचा तपशील जाहीर करण्याचं आवाहन विरोधकांनी केलं होतं

CoronaVirus Rs 3100 Crore From PM CARES Fund Allocated kkg | CoronaVirus News: पीएम केअर्समधून आतापर्यंत किती रुपये खर्च?; मोदी सरकारनं पहिल्यांदाच दिली आकडेवारी

CoronaVirus News: पीएम केअर्समधून आतापर्यंत किती रुपये खर्च?; मोदी सरकारनं पहिल्यांदाच दिली आकडेवारी

googlenewsNext

नवी दिल्ली: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारनं पीएम केअर्स फंड सुरू केला. याबद्दलचा तपशील जाहीर करण्याचं आव्हान विरोधकांकडून दिलं जात होतं. पीएम केअर्सचं ऑडिट करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली होती. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयानं पीएम केअर्स फंडामधून करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील जाहीर केला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी पीएम केअर्समधून ३१०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. 

पीएम केअर्समधील ३१०० कोटी रुपये आतापर्यंत विविध वैद्यकीय साहित्याच्या खरेदीसाठी देण्यात आले आहेत. यातील २००० कोटी रुपये व्हेंटिलेटर खरेदीसाठी दिले गेले आहेत. एक हजार कोटी रुपये प्रवासी मजुरांच्या व्यवस्था करण्यासाठी देण्यात आले आहेत. तर १०० कोटी रुपये कोरोनावरील लसीवर खर्च केले जाणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मोदींनी पीएम केअर्स फंड सुरू केला. यामध्ये सढळ हस्ते दान करण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं.

२७ मार्च २०२० रोजी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली पीएम केअर्स फंडाची सुरुवात झाली. या ट्रस्टमध्ये संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांचा समावेश आहे. पीएम केअर्समध्ये जमा केलेल्या रकमेबद्दल मोदींनी जनतेचे आभार मानले. कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी, वैद्यकीय सेवा वाढवण्यासाठी पीएम केअर्समधील निधीचा वापर करण्यात येईल. यामधून ५० हजार व्हेंटिलेटर खरेदी केले जाणार आहेत. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या कोविड-१९ रुग्णालयांना व्हेंटिलेटर दिले जातील. 

स्थलांतरित मजूर आणि गरिबांच्या कल्याणासाठी पीएम केअर्समधून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना १ हजार कोटी रुपये दिले जातील. यामधून मजुरांच्या राहण्याची, खाण्याची, वैद्यकीय उपचारांची सोय केली जाईल. याशिवाय १०० कोटी रुपये लसीवर संशोधन करण्यात देण्यात आले आहेत. देशातल्या जनतेनं पीएम केअर्समध्ये मोठ्या प्रमाणात दान केलं आहे. जनतेनं दिलेला पैसा जनतेच्याच कामी येईल. त्यामुळे यात सढळ हस्ते दान करण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं.

...म्हणून ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा; शिवसेनेची मोठी मागणी

नीरव मोदीने मला मारुन टाकण्याची धमकी दिली; ब्रिटीश कोर्टात ‘त्या’ व्यक्तीचा व्हिडीओ सादर

विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

Web Title: CoronaVirus Rs 3100 Crore From PM CARES Fund Allocated kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.