Coronavirus:...म्हणून त्यावेळी मला खूप दु:ख झालं; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 02:44 PM2020-05-14T14:44:03+5:302020-05-14T14:51:08+5:30

आज पीपीई किट्सच्या उत्पादनात भारत स्वावलंबी आहे, या उत्पादनाचं निर्यातही करत आहे.

Coronavirus: Sad when PPE kits arrived from China; Expressed grief to Nitin Gadkari pnm | Coronavirus:...म्हणून त्यावेळी मला खूप दु:ख झालं; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत

Coronavirus:...म्हणून त्यावेळी मला खूप दु:ख झालं; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत

Next
ठळक मुद्देपाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था तयार करण्यात आत्मनिर्भर भारत पॅकेजचं योगदान मोठं भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, झटपट निर्णय होणं गरजेचं आहेचीनने जेव्हा भारतात पीपीई किट्स पाठवल्या होत्या तेव्हा दुख: झालं होतं

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान भारत स्वावलंबी बनत आहे. भारतात अनेक गोष्टी तयार होत आहेत. पीपीई किट्स, मास्क, सॅनिटायझरसारख्या वस्तू भारतात बनल्या जात आहेत त्याचसोबत निर्यातदेखील करत आहे असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

त्याचसोबत चीनने जेव्हा भारतात पीपीई किट्स पाठवल्या होत्या तेव्हा दु:ख झालं होतं. आज पीपीई किट्सच्या उत्पादनात भारत स्वावलंबी आहे, या उत्पादनाचं निर्यातही करत आहे. ५ एप्रिल रोजी भारताने चीनकडून १ लाख ७० हजार पीपीई किट्स पाठवल्या होत्या. यातील ५० हजार किट्स सुरक्षेच्या दृष्टीने कमकुवत निघाल्या.

दरम्यान, भारताने सॅनिटायझर उद्योगावर कधी लक्ष दिलं नाही. त्यावेळी सॅनिटायझर बनवण्यासाठी लागणारी अल्कहोल १२०० रुपये लीटर होती. तेव्हा सरकारने साखर कारखान्यांनीही अल्कहोल बनवावं असं सांगितलं. महाराष्ट्रात कंपन्यांनी जेव्हा हे बनवण्यास सुरुवात केली तेव्हा हे दर ४०० रुपये लीटरपर्यंत आले. भारतात आता व्हेंटिलेटरही बनवले जात आहेत असंही नितीन गडकरी म्हणाले.

त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर पॅकेजवर सांगताना गडकरी म्हणाले की, पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था तयार करण्यात आत्मनिर्भर भारत पॅकेजचं योगदान मोठं असेल. भूसंपादनाला वेग, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, झटपट निर्णय होणं गरजेचं आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, रोजगार वाढतील. ना गुजरात, ना महाराष्ट्र; पॅकेज संपूर्ण देशासाठी आहे. त्यात राज्य, जात, धर्म, पंथ, भाषा असं कुठलंही बंधन नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

...तर येत्या ६ महिन्यात ५ लाखांहून जास्त एड्स रुग्णांचा मृत्यू; WHO चा धक्कादायक रिपोर्ट

आयुष्यात ‘ती’ गोष्ट जिव्हारी लागली; एमबीबीएस डॉक्टर थेट IAS अधिकारी बनली!

विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

अर्थमंत्र्यांची घोषणा ५.९४ लाख कोटींची पण सरकारी खिशातून आता फक्त ५६,५०० कोटी जाणार!

...म्हणून ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा; शिवसेनेची मोठी मागणी

Web Title: Coronavirus: Sad when PPE kits arrived from China; Expressed grief to Nitin Gadkari pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.