coronavirus: सरपंच असो वा पंतप्रधान, कायदा सर्वांना समान; मोदींनी दिला महत्त्वाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 05:24 PM2020-06-30T17:24:11+5:302020-06-30T17:30:36+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढवण्याची घोषणा केली. तसेच कोरोनाच्या संकटकाळात कायद्याचे योग्य पालन व्हावे यासाठी महत्त्वाचे आदेशही दिले.

coronavirus: Sarpanch or Prime Minister, the law is the same for everyone; Modi gave an important order | coronavirus: सरपंच असो वा पंतप्रधान, कायदा सर्वांना समान; मोदींनी दिला महत्त्वाचा आदेश

coronavirus: सरपंच असो वा पंतप्रधान, कायदा सर्वांना समान; मोदींनी दिला महत्त्वाचा आदेश

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनदरम्यान गांभीर्याने नियमांचे पालन करण्यात येत होते. आता देशातील जनतेने तशाच प्रकारची सतर्कता दाखवण्याची गरजजे लोक नियमांचे पालन करत नसतील त्यांना रोखले पाहिजे. त्यांना समजावले पाहिजेविशेषत: कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांचे कठोरपणे पालन झाले पाहिजे

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन हटवल्यानंतर आता देशात अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, अनलॉकिंगचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढवण्याची घोषणा केली. तसेच कोरोनाच्या संकटकाळात कायद्याचे योग्य पालन व्हावे यासाठी महत्त्वाचे आदेशही दिले.

देशवासियांना संबोधित करताना मोदींनी अनलॉक-१ दरम्यान, लोकांचा बेजबाबदारपणा वाढल्याने नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, लॉकडाऊनदरम्यान गांभीर्याने नियमांचे पालन करण्यात येत होते. आता देशातील जनतेने तशाच प्रकारची सतर्कता दाखवण्याची गरज आहे. जे लोक नियमांचे पालन करत नसतील त्यांना रोखले पाहिजे. त्यांना समजावले पाहिजे. विशेषत: कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांचे कठोरपणे पालन झाले पाहिजे. एका देशाच्या पंतप्रधानांना सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय फिरल्याने दंडाला सामोरेर जावे लागले हे तुम्ही बातम्यांमध्ये पाहिले असेलच. आथा आपल्याकडेही स्थानिक प्रशासनाने अशी कारवाई समोरच्या व्यक्तीचे पद, प्रतिष्ठा विचारात न घेता केली पाहिजे.  

दरम्यान, मोदींनी आज पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या पुढच्या पाच महिन्यांसाठी विस्तार करण्याची घोषणाही केली. पुढच्या काळात येणारे सणवार विचारात घेऊन पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार दिवाळी आणि षटपूजा म्हणजेच नोव्हेंबर अखेरपर्यंत करण्याचा निर्णय घेतल्याचे मोदींनी जाहीर केले. देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देणारी ही योजना नोव्हेंबरमध्येही सुरू राहील, असे मोदींनी स्पष्ट केले. सरकारद्वारा या पाच महिन्यांसाठी ८० कोटीहून अधिक बंधु-भगिनींंना ५ किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ प्रत्येक व्यक्तीसाठी मोफत देण्यात येत आहे. तसेच, प्रत्येक कुटुंबाला 1 किलो हरभरा डाळही मोफत मिळेल. या योजनेच्या विस्तारात ९० हजार कोटीहून अधिक खर्च झाला असून गेल्या तीन महिन्यांचा खर्चही जोडला तर दीड लाख कोटी रुपये खर्च होतात, असेही मोदींनी सांगितले.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ज्या वस्तूसाठी होता चीनवर 'निर्भर', त्याच्याच निर्मितीत भारत बनला 'आत्मनिर्भर', आता करणार निर्यात

हातात घेऊन कृपाण, गलवानमध्ये बारा चिन्यांचे केले शिरकाण; २३ वर्षांच्या जवानाचा महापराक्रम

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

चीनविरोधात सैन्य पाठवण्यामागे अमेरिकेचा हा आहे सुप्त हेतू, या ठिकाणांवरून परिस्थितीवर ठेवलीय नजर

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....

Web Title: coronavirus: Sarpanch or Prime Minister, the law is the same for everyone; Modi gave an important order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.