अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकून ऑक्सिजन येणार नाही, जरा मुंबईकडून शिका... SC नं केंद्राला फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 04:27 PM2021-05-05T16:27:52+5:302021-05-05T16:29:09+5:30
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की चार अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकून ऑक्सिजन येणार नाही. जीव वाचविण्यावर आपल्याला लक्ष द्यावे लागेल. दिल्लीत कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. एवढेच नाही, तर गेल्या तीन दिवसांत करण्यात आलेल्या ऑक्सिजन सप्लायसंदर्भातही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला विचारणा केली आहे.
नवी दिल्ली - ऑक्सिजन संकटाच्या मुद्द्यावर केंद्राच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सोर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे, की आदेशाचे पालन करणे, ही केंद्राची जबाबदारी आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्रवाई करा. (Supreme court on centre plea delhi hc contempt warning on oxygen supply in delhi)
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी राजधानी दिल्लीतील ऑक्सिजन संकटावर सल्ला दिला, की वैज्ञानिक पद्धतीने याच्या वितरणाची व्यवस्था करण्यात यावी. मुंबईच्या बीएमसीने कोरोना काळात छान काम केले आहे. अशात दिल्लीने काही शिकायला हवे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की चार अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकून ऑक्सिजन येणार नाही. जीव वाचविण्यावर आपल्याला लक्ष द्यावे लागेल. दिल्लीत कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. एवढेच नाही, तर गेल्या तीन दिवसांत करण्यात आलेल्या ऑक्सिजन सप्लायसंदर्भातही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला विचारणा केली आहे.
आम्ही बफर स्टॉक तयार करण्याचे संकेत दिले होते. अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईत केले जाऊ शकते, तर निश्चितपणे दिल्लीतही केले जाऊ शकते. दिल्लीला 700 मेट्रिक टन ऑक्सिजन केव्हा आणि कसा मिळेल, हे सोमवारपर्यंत सांगा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
राजधानीतील ऑक्सिजन पुरवठ्याच्या आदेशाचे पालन करण्यासंदर्भात कुचराईमुळे दिल्ली उच्च न्यायालयाने बजावलेल्या अवमानना नोटिशी विरोधात केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर आज सुनावणी झाली.
गेल्या 24 तासांत देशात 3,82,315 नवे रुग्ण -
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे.