coronavirus: या तारखेनंतर सुरू होणार देशातील शाळा, कॉलेज; केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 04:46 PM2020-06-07T16:46:19+5:302020-06-07T17:01:23+5:30

आता जून महिन्याला सुरुवात झाल्याने शाळा, महाविद्यालये सुरू होणार की नाही याबाबत विद्यार्थी, आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देशातील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. 

coronavirus: schools, colleges in the country starting after 15th august - Ramesh Pokhriyal | coronavirus: या तारखेनंतर सुरू होणार देशातील शाळा, कॉलेज; केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी दिली माहिती

coronavirus: या तारखेनंतर सुरू होणार देशातील शाळा, कॉलेज; केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी दिली माहिती

Next
ठळक मुद्देदेशातील शाळा आणि महाविद्यालये अॉगस्टनंतर पुन्हा सुरू करण्यात येतील१५ अॉगस्ट २०२० नंतर देशातील शैक्षणिक संस्था सुरू होतील१५ अॉगस्टपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यापासून संपूर्ण देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बहुतांश वर्गांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, आता जून महिन्याला सुरुवात झाल्याने शाळा, महाविद्यालये सुरू होणार की नाही याबाबत विद्यार्थी, आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देशातील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. 

रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, देशातील शाळा आणि महाविद्यालये अॉगस्टनंतर पुन्हा सुरू करण्यात येतील. शक्यतो १५ अॉगस्ट २०२० नंतर देशातील शैक्षणिक संस्था सुरू होतील. दरम्यान, १५ अॉगस्टपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी यासंदर्भात रमेश पोखरियाल निशंक यांना पत्र लिहिले होते. "आपल्याला कोरोनासोबत जगावे लागेल, हे मान्य करून देशातील शाळांची भूमिका नव्याने तयार करण्याची वेळ आली आहे. तसेच शाळांना याबाबत साहसी भूमिका घेण्यास तयार करण्यात आले नाही तर ती आपली ऐतिहासिक चूक ठरेल. शाळांची भूमिका केवळ पाठ्यपुस्तकांपर्यंच मर्यादित नाही. तर मुलांना एक जबाबदार जीवन जगण्यासाठी तयार करण्याची आहे," असे सिसोदिया यांनी या पत्रात म्हटले होती. 

देशात कोरोनाचा संसर्ग  होऊ लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशभरातील शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली होती. तसेच विविध वर्गांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या.

Web Title: coronavirus: schools, colleges in the country starting after 15th august - Ramesh Pokhriyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.