Coronavirus : बापरे! …तर भारतात 13 लाख लोकांना होऊ शकतो कोरोना, शास्त्रज्ञांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 12:35 PM2020-03-25T12:35:32+5:302020-03-25T12:50:25+5:30
Coronavirus : COVID-19च्या उपचारासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही आहे.
नवी दिल्ली – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी लोकांना रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर वाढता धोका लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली.भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या 560 वर गेली आहे. तर आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भारतातील कोरोनाग्रस्त आणि संसर्ग पाहून शास्त्रज्ञांनी एक इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांच्या मते भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास मेपर्यंत ही संख्या तब्बल 13 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञ आणि संशोधक यांनी कमी टेस्ट केल्या आहेत. इतर देशांपेक्षा भारतात ही संख्या कमी आहे. 18 मार्चपर्यंत भारतात केवळ 11 हजार 500 चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे ही गोष्ट भारतासाठी चिंताजनक आहे. न्यूज़ एजन्सी IANS च्या एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारतात कोरोनाचा अभ्यास करणाऱ्या COV-IND-19 स्टडी ग्रुप के रिसर्चनी आकडेवारी पाहून ही शंका व्यक्त केली आहे.
Coronavirus : पंतप्रधान मोदींनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, खऱ्या हिरोंसाठी केली प्रार्थनाhttps://t.co/quSEtQ2Ujz#coronavirusinindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) March 25, 2020
एका शास्त्रज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, ‘COVID-19च्या उपचारासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यांतून तिसऱ्या टप्प्यात गेल्यानंतर याचा परिणाम भारताच्या आरोग्या सेवा प्रणाली होईल. अशा परिस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या रोखणे कठीण होईल.’ असाच काहीसा प्रकार अमेरिका आणि इटलीमध्ये घडला. दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात जाताना इटलीमध्ये तिपटीने कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली. एका हिंदी वेबसाईट याबाबतचे वृत्त दिले आहे.
#IndiaFightsCorona २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये नेमकं काय बंद, काय सुरू राहणार याची सविस्तर माहिती.
— Lokmat (@MiLOKMAT) March 25, 2020
संपूर्ण बातमीसाठी क्लिक करा-https://t.co/iTJzBdLPNqpic.twitter.com/fDMoNqKk0I
भारताने सध्याची परिस्थिती आटोक्यात आणली असली तरी येणारा काळ हा भारतासाठी धोकादायक असू शकतो असंही यामध्ये या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. 19 मार्चपर्यंत भारताने अमेरिका पॅटर्न अंगीकारला आहे. तर, अमेरिकेतील रुग्णांची वाढ ही इटलीमध्ये होणाऱ्या वाढीसारखी होती. ज्यात साथीचा रोग सुरुवातीच्या काळात 11 दिवसांनी वाढला होता. त्यामुळे भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्य अशीच वाढल्यास मेपर्यंत ही संख्या तब्बल 13 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : पंतप्रधान मोदींनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, खऱ्या हिरोंसाठी केली प्रार्थना
Coronavirus: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! देशातील रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद
Coronavirus : कोरोनाचा कहर! जगभरात तब्बल 18,892 लोकांना गमवावा लागला जीव