CoronaVirus: फ्लूसदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांचीही स्क्रीनिंग चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 01:12 AM2020-04-20T01:12:59+5:302020-04-20T01:13:17+5:30

केंद्र सरकार देशभरातील अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनाविषयक स्क्रीनिंग चाचणीची सोय टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देणार आहे.

CoronaVirus A screening test for patients with flu like symptoms | CoronaVirus: फ्लूसदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांचीही स्क्रीनिंग चाचणी

CoronaVirus: फ्लूसदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांचीही स्क्रीनिंग चाचणी

Next

नवी दिल्ली : देशभरात झालेला कोरोना साथीचा फैलाव लक्षात घेता, फ्लूसदृश लक्षणांची तक्रार घेऊन रुग्णालयांत येणाºया सर्व व्यक्तींचीही कोरोनाविषयक स्क्रीनिंगचाचणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोनाबाधित भागांमध्ये एकाच वेळी अनेकांची तपासणी करावी लागते.त्यामुळेच वैद्यकीय चाचणीची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकार देशभरातील अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनाविषयक स्क्रीनिंग चाचणीची सोय टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देणार आहे. फ्लूसदृश लक्षणे जाणवणाºया कोणत्याही व्यक्तीने स्वत:हून पुढे येऊन रुग्णालयांमध्ये ही तपासणी करून घ्यावी.

फ्लूसदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींची कोरोनाविषयक स्क्रीनिंगचाचणी करण्याचे काम काही खासगी रुग्णालयांमधून याआधीच सुरू झाले आहे. या रुग्णांना तपासणारे डॉक्टर व त्यांच्या हाताखाली असलेल्या नर्स किंवा अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट
(पीपीई) पुरविण्याचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. पीपीईच्या संचांचा जाणवत असलेला तुटवडा दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

Web Title: CoronaVirus A screening test for patients with flu like symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.